शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-बारामती पॅसेंजरची ‘लेट’ सवारी : प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:20 IST

पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देलोणी, मांजरी, उरुळी, यवत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल

पुणे : पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही गाडी वेळेत सोडता येत नसेल तर पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणीही प्रवासी करू लागले आहेत. दौंड वरून सकाळी ७.०५वाजता सुटणारी दौंड-पुणे पॅसेंजर गाडी पुण्यात सकाळी ८.४५ वाजता पोहोचते. या गाडीचा दि. २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत केला आहे. पुण्यातून सकाळी ९.०५ वाजता निघून दुपारी १.४० वाजता पनवेल स्थानकात पोहचते. त्यानंतर पनवेल वरून दुपारी २.४० वाजता पुण्यासाठी रवाना होते आणि सायंकाळी ६.१० वाजता पोहोचते. हीच गाडी पुण्यातून सायंकाळी ६.४५ वाजता बारामतीला सोडली जाते. पॅसेंजरचा विस्तार पनवेलपर्यंत केला तेव्हापासून आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस किमान एक ते दीड तास उशिरा सुटते. यामुळे दैनंदिन पुणे ते दौंड-बारामती प्रवास करणारे लोणी, मांजरी, उरुळी, यावत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावर या गाडी शिवाय इतर कोणती ही गाडी थांबत नाही. ही गाडी वेळेत धावणार नसेल तर तिचा विस्तार रद्द करावा अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान, पनवेल येथून गाडी सुटल्यानंतर खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जत येथे गाडीच्या पाठीमाग इंजिन जोडण्यात येते. हे इंजिन जोडण्यास सुमारे तासभर लागतो. त्यानंतर १५-२० मिनिटांनी गाडी सुटते. त्यामुळे पुण्यात येण्यास गाडीला विलंब होत आहे. या गाडीसाठी अनेक प्रवासी थांबून असतात. पण गाडी वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या पॅसेंजरचे दोन रेक करून एक रेक पुण्यात थांबवून वेळेत बारामतीला सोडण्यात यावा, असे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीpassengerप्रवासीrailwayरेल्वे