शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्ग होणार ‘हरित मार्ग’

By admin | Updated: July 2, 2015 23:59 IST

देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर सुमारे अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हा दोनशे पंचवीस कि.मी.चा पवित्र मार्ग एक ‘हरित मार्ग’ म्हणून भविष्यात

आळंदी : देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर सुमारे अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हा दोनशे पंचवीस कि.मी.चा पवित्र मार्ग एक ‘हरित मार्ग’ म्हणून भविष्यात ओळखला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आळंदीत सांगितले. पालखी मार्गावर करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आळंदीत शुभारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शासनस्तरावर सर्वच कामे शक्य नसल्यामुळे पुणे येथील सामाजिक संस्थेकडे वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, वृक्षलागवड करतानाच सशक्त असलेले व किमान पाच ते सहा वर्षे वाढ झालेल्या वृक्षांचीच लागवड करण्यात येणार आहेत. सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. वारकऱ्यांचे आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेण्यामध्ये प्रशासन कुठेही कमी पडणार नसल्याचेही बापट यांनी सांगितले. येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गोपालपुरा परिसरात यंदाचे मानकरी पांडुरंग तुकाराम वरखेडे यांच्या ‘सोन्या व हिऱ्या’या बैैलजोडीची पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर बैलजोडीची मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. नदीघाटावरील भाजीमंडई परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी माऊलींचे दर्शन घेतले.त्यांच्यासमवेत पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, ज्ञानेश्वर शिक्षणसंस्थेचे सुरेश वडगावकर, विलास कुऱ्हाडे, भाजपाचे संजय घुंडरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम, नगरसेवक राजेंद्र गिलबिले, माजी सरपंच अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, भाजपाचे भागवत आवटे, नगरसेवक डी. डी. भोसले, रमेश गोगावले आदी उपस्थित होते. या वृक्षांच्या लागवडीनंतर संगोपन करण्यासाठी गावपातळीवरच्या हद्दीतील वृक्ष दत्तक देवून किमान १० लोकांचे पथक कार्यरत राहील. त्यामुळे हा पालखी मार्ग भविष्यात निश्चितच ‘हरित मार्ग’ होईल, मात्र त्यासाठी लोकसहभाग नितांत गरजेचा आहे. - माधव जगताप, माऊली हरित अभियान, प्रमुख