'आमच्या मोठ्या ओळखी, परिणाम भोगावे लागतील', स्वामी नलिनानंद गिरी महाराजांचा भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:59 IST2026-04-24T10:58:45+5:302026-04-24T10:59:28+5:30

या स्वामींना कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. मंदिर बंद असल्याने लेखी परवानगीशिवाय प्रवेश देता येणार नाही, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते - भीमाशंकर मंदिर संस्था

Our big acquaintances will have to face the consequences Swami Nalinanand Giri Maharaj's pressure for darshan at Bhimashankar temple | 'आमच्या मोठ्या ओळखी, परिणाम भोगावे लागतील', स्वामी नलिनानंद गिरी महाराजांचा भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी दबाव

'आमच्या मोठ्या ओळखी, परिणाम भोगावे लागतील', स्वामी नलिनानंद गिरी महाराजांचा भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी दबाव

घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकरमंदिर दुरुस्ती कामांमुळे बंद असल्याची स्पष्ट माहिती असतानाही अमेरिकेतून आलेल्या स्वामी नलिनानंद गिरी महाराज यांनी दर्शनासाठी दबाव टाकत उद्धट भाषा वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र कर्तव्यदक्ष पोलिसांनी नियमांनुसार त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. अमेरिकेतील ‘इटर्नल व्हॉईस’ संस्थेचे अध्यक्ष असलेले स्वामी नलिनानंद गिरी महाराज यात्रेसाठी भारतात आले होते. त्यांच्या सोबत सुमारे २० अमेरिकन नागरिक आणि ३० भारतीय नागरिक असा पन्नास जणांचा ताफा १५ वाहनांतून भीमाशंकर येथे पोहोचला होता.

सध्या मंदिरासमोरील सभामंडप व पायरी मार्गाच्या कामांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद आहे. या काळात कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही संबंधित स्वामींनी मोठ्या आवाजात दबाव टाकत मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

पोलिस हवालदार सुरेश काटे यांनी नम्रपणे समजावून सांगत नियमांची अंमलबजावणी केली आणि पथकाला पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी स्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून “आमच्या मोठ्या ओळखी आहेत, परिणाम भोगावे लागतील,” अशा शब्दांत दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कर्तव्य बजावले.

देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी सांगितले की, मंदिर बंद असल्याची माहिती देऊनही परवानगी न घेता येणे आणि प्रशासनावर टीका करणे चुकीचे आहे. भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या कामांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

परवानगीशिवाय आगमन अयोग्य

या स्वामींना कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. मंदिर बंद असल्याने लेखी परवानगीशिवाय प्रवेश देता येणार नाही, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते, असे देव संतोष संस्थेचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले. मंदिर सुरू होईपर्यंत भाविकांनी येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

बदनामीचा आरोप, कारवाईची मागणी

परवानगी नसताना येऊन दबाव टाकणे व भीमाशंकरची बदनामी करणे अयोग्य आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सरपंच दत्तात्रय हिले यांनी केली आहे.

नियम सर्वांसाठी समान

परदेशातून आले असले तरी नियमांचे पालन आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येऊन गोंधळ घालणे योग्य नाही, असे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी स्पष्ट केले.

Web Title : स्वामी ने भीमाशंकर मंदिर में दर्शन के लिए दबाव डाला, परिणाम भुगतने की चेतावनी दी।

Web Summary : स्वामी नलिनानंद गिरी ने एक बड़े समूह के साथ, कथित तौर पर बंद भीमाशंकर मंदिर में प्रवेश के लिए अधिकारियों पर दबाव डाला, यहां तक कि परिणाम भुगतने की चेतावनी भी दी। पुलिस ने नियमों का पालन करते हुए मरम्मत कार्य के कारण प्रवेश से इनकार कर दिया।

Web Title : Swami pressured Bhimashankar temple visit, warned of consequences: reports.

Web Summary : Swami Nalinanand Giri, with a large group, allegedly pressured officials for access to the closed Bhimashankar temple, even warning of consequences. Police enforced rules, denying entry due to ongoing repairs.