सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट! फेसबुकवरून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 08:00 PM2021-05-09T20:00:46+5:302021-05-09T20:00:52+5:30

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार; कारवाई करण्याची मागणी

Offensive post about Devendra Fadnavis on social media! Trying to tarnish images from Facebook | सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट! फेसबुकवरून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट! फेसबुकवरून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकाही लोक सोशल मिडियाचा व जेष्ठ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन समाजात तेढ निर्माण करतात

धायरी: सोशल मिडीयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट व कमेंट केल्याबद्दल संबंधित पेज बंद करून पेज चालवणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत तक्रार देण्यात आली आहे. खडकवासला भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विशाल दत्तात्रय उभे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

समाजातील काही लोक सोशल मिडियाचा व जेष्ठ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन समाजात तेढ निर्माण करत आहेत. फेसबुकवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो माॅर्फ करुन त्यावर तसेच आक्षेपार्ह कमेंट करून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विरोधी पक्षनेते हे पद एक संविधानिक पद आहे. तरी पेज बंद करून संबंधित पेज चालवणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असेही तक्रारीत म्हटले आहे. यावेळी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे ,समीर रुपदे, अभिषेक जावळकर उपस्थित होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Offensive post about Devendra Fadnavis on social media! Trying to tarnish images from Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app