शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 2:35 PM

एकाच महिला पोलिसांवर टवाळखोरांना रोखण्याचा भार

ठळक मुद्देभोर तालुक्यातील स्थिती ; सहा महिन्यांत केवळ ९१ कारवायातालुक्यात छेडछाड, टवाळखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस आहे वाढत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांअभावी एकही कारवाई झालेली नाही

भोर : महिला पोलीस कर्मचारी कमी असल्याने भोर उपविभागीय पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या चार पोलीस ठाण्यांत नेमलेल्या निर्भया पथकात एकच महिला पोलीस कर्मचारी काम करत आहे. यामुळे चार पोलीस ठाण्यातील केवळ एका महिला कर्मचारीला शहरात जाऊन छेडछाड टवाळखोरी रोखण्याच्या घटना अवघड होत आहे. यामुळे तालुक्यात छेडछाड, टवाळखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य महिला आणि मुलींना सहन करावा लागत आहे.  भोर तालुका दुर्गम डोंगरी असून शाळा-कॉलेजला ग्रामीण भागातून अनेक मुली शिक्षणासाठी एसटीने प्रवास करुन येतात. या  मुलींची छेडछाड, टवाळखोरी होऊ नये, यासाठी भोर उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून जेजुरी, सासवड, भोर आणि नसरापूर येथील पोलीस ठाणे मिळून निर्भया पथक स्थापन करण्यात आले.  प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजाराच्या दिवशी जाऊन टावळखोर, छोडछाड करणाºयांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाते. मागील वर्षी या पथकात तीन महिला पोलीस काम करीत होत्या. मात्र, भोरला महिला पोलीस कमी असल्याने मागील सहा महिन्यांपासून नसरापूर पोलीस ठाण्यातील केवळ एका महिला पोलिसांची चार पोलीस ठाण्यांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.  चारही पोलीस ठाण्यांचे अंतर आणि निर्भया पथकात एकच महिला पोलिसांची नेमणूक करण्यात असल्याने निर्भया पथकाचे काम कसे चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या परिसरासाठी केवळ एक महिला पोलीस असल्याने दिवसेंदिवस टवाळखोरी आणि छेडछाड करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी निर्भया पथकात महिला पोलीस वाढवण्याची  गरज आहे. तरच कारवाई शक्य होणार आहे. अन्यथा हे पथक नावालाच राहणार आहे....सहा महिन्यांत केवळ ९१ कारवायाविटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांची मुले शाळेत जात नाहीत. या विटभट्ट्यांना भेटी देऊन त्यांची माहिती घेण्याचे काम निर्भया पथकालाच करायचे आहे. मात्र, पथकात महिला पोलीस कमी असल्याने हे काम करणे शक्य होत नाही. निर्भया पथकाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात २३, फेब्रुवारी महिन्यात ३०, मार्च महिन्यात ११, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात शून्य, जून महिन्यात  ६, जुलै महिन्यात ११, तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांअभावी एकही कारवाई झालेली नाही. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत केवळ ९१  कारवाया करण्यात आलेल्या आहेत........निर्भया प्रथकाच्या माध्यमातून भोर, नसरापूर, सासवड, जेजुरी या पोलीस ठाण्यांर्तगत असलेल्या शाळा-कॉलेजात जाऊन मुलींना समुपदेशन करणे, छेडछाड होऊ नये म्हणून मार्गदर्शन करणे  या शिवाय  बसस्थानकावर, शाळा- कॉलेजच्या प्रवेशद्वारावर टवाळक्या करणारे, छेडछाड करणाºया मुलांवर त्वरित कारवाई करत असल्याचे निर्भया पथकाच्या प्रमुख स्वाती कुतवळ यांनी सांगितले.   

टॅग्स :bhor-acभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी