शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:25 IST

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही

नितीन चौधरी

पुणे : राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून प्रत्येक महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केला जातो. मात्र, एप्रिलचा अहवाल अद्यापही सादर झालेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा अहवाल त्यानंतरच सादर होईल हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल सादर झाल्यानंतरच महसूल विभागाकडून नुकसानभरपाईसंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येईल. त्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल, असे चित्र आहे.

एप्रिलमध्ये २८ हजार हेक्टर बाधित

राज्यात मार्चचा अखेरचा आठवडा आणि एप्रिलचे पहिले दोन आठवडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील २८ हजार ३५२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्यापही सुरू असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ पाच ते सहा जिल्ह्यांमधूनच नुकसानीचा ‘अबकड’ अंतिम अहवाल कृषी आयुक्तालय कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या अखेर व मे च्या सुरुवातीपासून अवकाळीने पुन्हा नुकसान झाल्याने पंचनाम्याचे काम सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘मे’मध्ये ६४ हजार हेक्टरचे नुकसान

त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सबंध मे महिन्यात पूर्व मोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांना फटका दिला. त्यात राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातही अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

अद्याप अहवालच नाही

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात मदत व पुनर्वसन विभाग अद्याप निर्णय घेऊ शकलेला नाही.

ऑक्टोबर २०२४ पर्यंतची मदत जमा

यापूर्वी राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६४० कोटी ४७ लाखांचा निधी वितरित केला होता. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या काळासाठी ५९० कोटी १५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfarmingशेतीSocialसामाजिकMONEYपैसा