शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

New Construction Projects: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवे ४८६ बांधकाम प्रकल्प; महारेराकडून १४८ प्रकल्पांतील सुधारणांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:34 IST

जुन्या प्रकल्पांच्या आराखड्यासह मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पांतील सुधारणांसह १ हजार ६० प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे.

पुणे : गुढीपाडवा, दसरा, दिवाळी आणि नववर्षाच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची बांधकाम क्षेत्रात परंपरा असून, यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. जुन्या प्रकल्पांच्या आराखड्यासह मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पांतील सुधारणांसह १ हजार ६० प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे.

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी तब्बल २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १२४ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले असून, ५३ प्रकल्पांना मुदतवाढ आणि ३४ प्रकल्पांच्या प्रस्तावातील सुधारणांनाही महारेराने मंजुरी दिली आहे. पाडव्यापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या या १ हजार ६० प्रकल्पांत ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिले आहेत. विकासकांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा केलेल्या विनंतीनुसार ४२६ प्रकल्पांचे मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १४८ जुन्या प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले होते. तेही मंजूर करण्यात आले आहेत.

महारेरा नोंदणी क्रमांक मिळालेल्या प्रकल्पांत मुंबई विभागातील ६०७, पुण्यातील ३२१ प्रकल्प, उत्तर महाराष्ट्रातील ६३, विदर्भातील ५० आणि मराठवाड्यातील १४ आणि दादरा नगर हवेलीमधील ५ प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पांच्या संख्येत पुणे जिल्ह्याची आघाडी असून, जिल्ह्यात २८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात १९६, ठाणे १८५, रायगड ११० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

जिल्हानिहाय मंजुरीचा तपशील

मुंबई महाप्रदेश एकूण ६०७

- मुंबई उपनगर १९६
- ठाणे १८५
- रायगड ११०
- पालघर ५२
- मुंबई शहर ४२
- रत्नागिरी १४
- सिंधुदुर्ग ८

पुणे विभाग एकूण ३२१

पुणे २८६
सातारा १६
कोल्हापूर १३
सांगली ५
सोलापूर १

उत्तर महाराष्ट्र एकूण ६३

- नाशिक ४१
- अहिल्यानगर १९
- जळगाव २
- धुळे १

विदर्भ एकूण ५०

- नागपूर ४२
- अमरावती ६
- चंद्रपूर १
- यवतमाळ १

मराठवाडा - एकूण १४

- संभाजीनगर १०
- नांदेड २
- लातूर १
- धाराशिव १

दादरा नगर हवेली - ५

English
हिंदी सारांश
Web Title : New Construction Projects Launched in Maharashtra on Gudi Padwa

Web Summary : Maharashtra sees 486 new construction projects registered on Gudi Padwa. MahaRERA approved 1,060 projects, including modifications and extensions. Pune leads with the highest number of project approvals, followed by Mumbai.
टॅग्स :Puneपुणेgudhi padwaगुढीपाडवाFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाReal Estateबांधकाम उद्योग