1 / 10देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाचं कनेक्शन लातूरमधल्या प्रसिद्ध अशा रेणुकाई करिअर सेंटरचे (आरसीसी) क्लासेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. 2 / 10याप्रकरणी आरसीसी क्लासेसचा संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकरला सीबीआयने अटक करत नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. 3 / 10मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. याशिवाय १० दिवस आधीच म्हणजे २३ एप्रिललाच मोटेगावकरकडे नीटची प्रश्नपत्रिका आली होती, असाही आरोप आहे. 4 / 10स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी अधिक गुण मिळावेत, यासाठीच मोटेगावकर यांनी पेपरफूट केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मोटेगावकर हा प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि पसरवण्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य होता. 5 / 10केवळ लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसच्या शाखा आहेत. 6 / 10उत्तम मार्क पडण्याचे आश्वासन मोटेगावकरच्या या आरसीसी क्लासेसमध्ये दिलं जायचं. NEET आणि JEE चे विशेष वर्गही चालवले जायचे. पण, यासाठी मोटेगावकर विद्यार्थ्यांकडून किती फी घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का? 7 / 10आरसीसी क्लामध्ये अॅडमिशन घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला तब्बल काही लाख रुपये मोजावे लागायचे. अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी २ लाख ४० हजार फी घेतली जायची. 8 / 10तर फक्त बारावीसाठी अॅडमिशन घ्यायचं असेल तर १ लाख २० हजार इतकी फी विद्यार्थ्यांचे पालक भरायचे. 9 / 10फक्त PCB (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) किंवा PCM (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) अशा विशिष्ट विषयांच्या ग्रुपसाठी ६० हजार इतकी फी होती. 10 / 10दरवर्षी हजारो विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये प्रवेश घ्यायचे. त्याच्या क्लासचा वर्षाचा टर्नओव्हर हा जवळपास १०० कोटी इतका असल्याचं सांगण्यात येत आहे.