शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

NEET Exam Paper Leak: '१० लाख आले', चॅटवरून घेतले महिलेला ताब्यात; नीट पेपर लीक प्रकरणात पुण्यात चौघांचा गट होता कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:02 IST

NEET Exam Paper Leak धनंजय लोखंडे, ओंकार शिंगोटे, मनिषा वाघमारे आणि शेषराव सोलंकी या चौघांचा गट पुण्यात अशा प्रकरणांसाठी कार्यरत असल्याची माहिती पुणे पोलिसांकडे होती

पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले असून, या घोटाळ्यातील ‘पुणे कनेक्शन’ समोर आले आहे. सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर, लोखंडेच्या संपर्कात असलेल्या बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. विद्यार्थी शोधणे, त्यांच्याकडून पैसे गोळा करणे आणि संशयितांपर्यंत पोहोचवणे, अशी भूमिका या दोघांची असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

सुखसागरनगर परिसरातून मनीषा वाघमारे (वय ४६) हिला ताब्यात घेतले असून, मांजरीतून वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शेषराव सोलंकी याला गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारपासून पुणे पोलिस चार जणांचा शोध घेत होते. त्यामध्ये धनंजय लोखंडे आणि ओंकार शिंगोटे यांचाही समावेश होता. धनंजय लोखंडे याचे लोकेशन वाघोली परिसरात मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो फरार झाला. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) धनंजय आणि ओंकार या दोघांना ताब्यात घेतले.

तांत्रिक तपासाच्या दरम्यान मनीषा वाघमारे आणि शेषराव सोलंकी हे दोघेही धनंजय लोखंडेच्या सतत संपर्कात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सकाळी सुमारे आठच्या सुमारास सुखसागर नगर येथून मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर दुपारी तिला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. दुसरीकडे शेषराव सोलंकी याचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मनीषा वाघमारे हिचे बिबवेवाडीत ब्युटी पार्लर असून, तिचा पती डेंटिस्ट आहे. पोलिस तपासात सुमारे तीन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांची ओळख झाली होती. मुलीला मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत लोखंडे तिच्या संपर्कात आला होता. विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ग्राहक शोधून दिल्यास चांगले कमिशन देण्याचे आमिष लोखंडेने तिला दाखविले होते. पार्लरमध्ये येणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधताना ती मेडिकल प्रवेशाविषयी चर्चा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. नीट परीक्षेपूर्वी काही दिवसांमध्ये मनीषा वाघमारेच्या बँक खात्यात सुमारे दहा लाख रुपये जमा झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हे पैसे नीट परीक्षा आणि मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, याची चौकशी सुरू आहे. पुण्यात या संपूर्ण रॅकेटसाठी स्वतंत्र नेटवर्क सक्रिय होते. पोलिसांनी मनीषा वाघमारेचा मोबाइल जप्त केला असून, अनेक व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचे आढळून आले आहे. मात्र, ‘१० लाख रुपये आले आहेत’ असा उल्लेख असलेला एक चॅट पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे संशय गडद झाला आहे.

चौघांचा गट शहरात होता कार्यरत?

धनंजय लोखंडे, ओंकार शिंगोटे, मनिषा वाघमारे आणि शेषराव सोलंकी या चौघांचा गट पुण्यात अशा प्रकरणांसाठी कार्यरत असल्याची माहिती पुणे पोलिसांकडे होती. धनंजय आणि ओंकार यांची शहरात नेहमी ये-जा असायची. यामुळे किती लोकांकडून यांनी पैसे घेतले आहेत, याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.

नीट पेपर लीक प्रकरणात संशयाच्या आधारे महिला आणि एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेला प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले असून, युवकाची सविस्तर चौकशी सुरू आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Woman Detained, Pune Link Emerges, Four Suspects.

Web Summary : Pune police uncovered a NEET paper leak connection, detaining a woman and student. They are suspected of collecting money from students. Investigation revealed ₹10 lakh deposited in woman's account. A four-member group was active in Pune.
टॅग्स :PuneपुणेNEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकEducationशिक्षणStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी