शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 1:12 PM

'पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे', राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी...

पुणेपुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्यानं एका विद्यार्थ्याकडून दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळली व आणखी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सराईत गुंडाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. 

अमर सूर्यकांत पोळ (रा.मु.पो, खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार करण मधुकर कोकणे (रा. अमरकुंज सोसायटी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २३ वर्षांच्या तरुणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांची एका मित्राद्वारे अमर पोळ याच्याशी ओळख झाली होती. त्याने डिसेंबर २०१९ मध्ये नवीन सोशल मीडियाचे व्यवसायासाठी ऑफिस सुरू करण्यासाठी फिर्यादीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

तेव्हा पोळ याने तू आम्हाला पैसे का देत नाही, तुला आम्ही पैसे मागतो ते समजत नाही का, तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही का, तुला आम्हाला पैसे द्यायचे नाही का, तुला पुण्यात शिक्षण करू देणार नाही. तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. फिर्यादीकडून पाच लाख रुपये बैंक ट्रान्सफरद्वारे घेतले. तसेच करण कोकणे याने आणखी एका तरूणाकडून २ ते ३ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.

काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन पैसे न दिल्याने त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर पोळ याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसArrestअटक