शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

International Women Day : निडर सर्पमित्र..! तळेगावच्या केतिका कासेटवार यांचा साप बचावासाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:44 IST

- साप हाच खरा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदरांचा फडशा पडतो. सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.

- विलास भेगडे

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरात कोठेही साप दिसला की, ‘तिला’ बोलावणे धाडले जाते. साप विषारी असो की बिनविषारी, ती निडरपणे पुढे सरसावते. त्याला अलगद पकडते आणि अधिवासात सोडून देते. गेल्या दहा वर्षांत तिने अनेक विषारी - बिनविषारी साप पकडून त्यांना अधिवासात सोडून दिले आहे. केतिका कासेटवार (वय ४४) असे तिचे नाव. प्राणी कल्याण व पर्यावरण संवर्धनासाठी प्राधान्य देणाऱ्या वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या त्या सक्रिय सदस्य आहेत.

सर्पमित्र किरण मोकाशी, नीलेश गराडे, जिगर सोलंकी आणि अन्य ज्येष्ठ सदस्यांकडून केतिका यांनी सापाविषयीचे बारकावे आत्मसात केले. ग्रामीण भागात अजूनही सापांविषयी गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत. त्या दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी केतिका यांनी जनजागृती मोहिमा राबविल्या. याशिवाय इतर प्राण्यांचीही सुटका केली आहे.

त्या वन्यजीव बचावकर्ती आहेत. त्यांनी नेहमीच निसर्गसंवर्धनास प्राधान्य दिले आहे. साप हाच खरा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदरांचा फडशा पडतो. सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. सापांना वाचविणे आणि मानवता हाच खरा धर्म आहे, यासाठी त्या कष्ट घेत आहेत. अनुभवाच्या जोरावर त्यांनी बचाव मोहिमा आणि जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या हिमतीने केले.

भारतात सापांची भीती मुख्यत्वे ज्ञानाच्या अभावामुळे उद्भवते आणि जागरूकता हे सहअस्तित्वाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे, यावर केतिका यांचा दृढ विश्वास आहे. वन्यजीव जागरूकता केवळ संवर्धन कार्य म्हणून त्या पाहत नाहीत तर सहानुभूती, वैज्ञानिक विचारसरणी आणि नैसर्गिक जगाबद्दल आदर वाढवण्याचा शक्तिशाली मार्ग म्हणून पाहतात.

 मानव आणि प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि हे परस्परसंबंध समजून घेणे भविष्यातील पिढ्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे.  - केतिका कासेटवार, सर्पमित्र, तळेगाव दाभाडे

English
हिंदी सारांश
Web Title : Talegaon woman fearlessly rescues snakes, promoting conservation and dispelling myths.

Web Summary : Ketika Kasetwar, a Talegaon wildlife rescuer, fearlessly saves snakes, educating about their importance. She dispels myths, advocating for coexistence and conservation, emphasizing snakes' role in agriculture. She believes awareness fosters respect for nature.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिला