शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास आम्ही पुणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावरती लढू - रवींद्र धंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:57 IST

पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी असून सैन्य तयार आहे फक्त आदेशाची वाट पाहत आहोत

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पक्ष वरिष्ठांच्या बैठकही सुरु झाल्या आहेत. अशातच पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करावी, असे आदेश राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे. 

प्रभाग रचनेचा आदेश येताच शिवसेनेचे रवींद्र धंगेकर ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून आले आहेत. त्यांनी निवडणुकांसाठी स्वबळाचा लढण्याचा नारा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी आहे. पुण्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेची  बैठक झाली. पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावरती लढू. सैन्य तयार आहे फक्त आपण आदेशाची वाट पाहत आहोत अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. 

रवींद्र धंगेकर यांचा विधानसभेत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. शिवसेना पुणे महानगरप्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली. आता त्यांनी महापालिका निवडणुकीच्या लढण्याच्या दृष्टीने तयारी दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी स्वबळावरती लढण्याचा नारा दिला आहे. 

प्रभाग रचनेची अशी होणार प्रक्रिया

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पालिका आयुक्तांनी सादर करावी. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी प्रसिद्ध करावी. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनावर राज्यसरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. त्यानंतर पालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी असे राज्यसरकारने आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे