मी भाजपासोबत नाही तर भाजपा माझ्यासोबत आहे - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:12 IST2026-05-05T10:11:16+5:302026-05-05T10:12:00+5:30

जोवर मी भाजपसोबत आहे, तोवर भाजपाची सत्ता येणार असून, मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळणार आहे

I am not with BJP, BJP is with me - Ramdas Athawale | मी भाजपासोबत नाही तर भाजपा माझ्यासोबत आहे - रामदास आठवले

मी भाजपासोबत नाही तर भाजपा माझ्यासोबत आहे - रामदास आठवले

पुणे: ‘‘दलित समाजाची ताकद मोठी असून, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे, हे माझ्या हातात आहे. काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसा मलाही केला होता. शिर्डीमध्ये मला जाणूनबुजून पराभूत केले, म्हणून मी काँग्रेसची साथ सोडून भाजपकडे गेलो आणि भाजपाची सत्ता आली. त्यामुळे मी भाजपसोबत नाही तर भाजप माझ्यासोबत आहे, असे मी मानतो,’’ असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समता भूमी येथे आयोजित केलेल्या 'भारताची भीमज्योत' कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. यावेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, 'रिपाइं'चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘‘बुद्धाचे तत्त्वज्ञान अंगीकारत बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारे संविधान देशाला दिले. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्ष केवळ तशा वावड्या उठवत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो, त्यांची सत्ता आल्याशिवाय राहत नाही. जोवर मी भाजपसोबत आहे, तोवर भाजपाची सत्ता येणार असून, मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळणार आहे.’’

Web Title : अठावले: भाजपा मेरे साथ है, मैं भाजपा के साथ नहीं।

Web Summary : रामदास अठावले ने कहा, दलित समाज की ताकत से भाजपा सत्ता में आई। उन्होंने संविधान बदलने की अफवाहों को खारिज किया और अंबेडकर के दर्शन को श्रेय दिया। अठावले ने भाजपा के निरंतर शासन और अपने चौथे मंत्री पद की भविष्यवाणी की।

Web Title : Athawale: BJP is with me, not the other way around.

Web Summary : Ramdas Athawale asserts his influence, stating BJP came to power after he joined them. He dismisses constitution change rumors, crediting Ambedkar's philosophy. Athawale predicts continued BJP rule and his fourth ministerial term.