आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:49 IST2026-05-05T13:48:57+5:302026-05-05T13:49:34+5:30
Madhya Pradesh News: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे बांधण्यात आलेला काटकोनात बांधलेला फ्लायओव्हर चर्चेत आला होता. तसेच या फ्लायओव्हरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर आता याच भोपाळमधील ऐशबाग येथे महानगरपालिकेने बांधलेलं एक शौचालय चर्चेत आलं आहे.

आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे बांधण्यात आलेला काटकोनात बांधलेला फ्लायओव्हर चर्चेत आला होता. तसेच या फ्लायओव्हरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर आता याच भोपाळमधील ऐशबाग येथे महानगरपालिकेने बांधलेलं एक शौचालय चर्चेत आलं आहे. येथील कुप्रसिद्ध ९० डिग्रीच्या पुलाजवळच वॉर्ड क्रमांक ४० येथे महानगपालिकेने रेल्वेच्या जमिनीवर एक सुलभ शौचालय बांधलं आहे. या सुलभ शौचालयाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाच रेल्वेने आपल्या जमिनीच्या सीमेवरून संरक्षक भिंत बांधली. त्यामुळे हे शौचालय या भिंतीच्या मागे गेले. तसेच आता लोकांना त्याचा वापर करता येणार नाही.
जेव्हा या सुलभ शौचालयाचं बांधकाम केलं जात होतं तेव्हा स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेकडे आक्षेपही नोंदवला होता. तसेच ही रेल्वेची जमीन असल्याने तिथे शौचालयाचं बांधकाम करू नका, असे सांगितले होते. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तसेच रेल्वेच्या जमिनीवर शौचालय बांधले. मात्र हे शौचालय बांधून पूर्ण होत असतानाच रेल्वेने आपल्या जमिनीच्या सीमेवरून संरक्षक भिंत बांधली.
रेल्वेने संरक्षक भिंत बांधल्याने रेल्वेच्या हद्दीत महानगरपालिकेने बांधलेल्या शौचालयासाठी झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच महानगरपालिकेच्या या कारभाराबाबत आता स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच आता या शौचालयाचा वापर करण्यासाठी महानगरपालिकेने आता फ्लायओव्हर बांधून द्यावा, असा खोचक सल्ला दिला जात आहे.