सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:06 IST2026-05-05T13:03:38+5:302026-05-05T13:06:44+5:30

अटलांटिक महासागरातील MV होंडियस क्रूझवर हंताव्हायरसचा प्रादुर्भाव. ३ पर्यटकांचा मृत्यू तर १४९ प्रवासी अडकले.

Beware! Death toll in the Atlantic Ocean; Hantavirus enters cruise, 3 tourists die! | सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!

सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!

कोरोनाच्या भीषण आठवणी ताज्या असतानाच आता अटलांटिक महासागरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. 'MV होंडियस' नावाच्या आलिशान क्रूझ शिपवर 'हंताव्हायरस'ने शिरकाव केला असून, आतापर्यंत तीन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या क्रूझवर २३ देशांतील १४९ प्रवासी अडकले असून, संसर्गाच्या भीतीने केप वर्डे सरकारने या प्रवाशांना किनाऱ्यावर उतरण्यास मनाई केली आहे. त्यामुळे भर समुद्रात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, MV होंडियस या जहाजावर ११ एप्रिलपासून आजारपणाचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला एका प्रवाशाचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये एका डच दांपत्याचा आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, एका ६९ वर्षीय ब्रिटिश नागरिकाला आणि मृत डच महिलेला हंताव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या एका ब्रिटिश नागरिकाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू आहेत.

२३ देशांचे नागरिक अडकले मृत्यूच्या सापळ्यात

या क्रूझवर एकूण १४९ लोक स्वार आहेत. केप वर्डे या आफ्रिकन बेटाजवळ हे जहाज उभे आहे. मात्र, संसर्ग पसरू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने कोणालाही जमिनीवर पाय ठेवू दिलेला नाही. जहाजावरील दोन क्रू मेंबर्समध्येही श्वसनाशी संबंधित गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून विशेष वैद्यकीय विमानाने बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे.

कसा पसरतो हा विषाणू?

हंताव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि घुशींच्या मलमूत्र किंवा लाळेतून पसरतो. यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होतात. दिलासादायक बाब म्हणजे, हा विषाणू एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे पसरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जहाजाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पुढील पाऊल काय?

जहाजावरील वातावरण सध्या शांत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी, प्रवाशांमध्ये धास्ती आहे. आता हे जहाज लास पालमास किंवा टेनेरिफेच्या दिशेने नेण्याचा विचार सुरू आहे, जिथे सर्व प्रवाशांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाईल. WHOचे युरोप संचालक हंस हेन्री पी क्लुगे यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले असून, हा आजार अत्यंत दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे.

Web Title : क्रूज जहाज पर हंतावायरस का प्रकोप: अटलांटिक में तीन मौतें

Web Summary : अटलांटिक महासागर में एमवी होंडियस क्रूज जहाज पर हंतावायरस के प्रकोप से तीन लोगों की मौत हो गई है। 23 देशों के 149 यात्री फंसे हुए हैं, जहाज संभावित रूप से चिकित्सा जांच के लिए लास पामास या टेनेरिफ़ जा रहा है। संक्रमण मुख्य रूप से चूहों के माध्यम से होता है।

Web Title : Hantavirus Outbreak on Cruise Ship: Three Deaths in Atlantic

Web Summary : A hantavirus outbreak on the MV Hondius cruise ship in the Atlantic has caused three deaths. 149 passengers from 23 countries are stranded, with the ship potentially heading to Las Palmas or Tenerife for medical checks. Transmission is primarily via rodents.