सर्वांसमोर पतीचा अपमान; तणावातून रिसेप्शनिस्ट महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:30 IST2026-04-29T18:30:07+5:302026-04-29T18:30:30+5:30

सर्वांसमोर मारहाण करुन लोकांसमोर झालेला अपमान महिलेला सहन झाला नाही, त्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला

Husband insulted in front of everyone; Receptionist woman takes extreme step due to stress, shocking incident in Pune | सर्वांसमोर पतीचा अपमान; तणावातून रिसेप्शनिस्ट महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

सर्वांसमोर पतीचा अपमान; तणावातून रिसेप्शनिस्ट महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : जीम ट्रेनर म्हणून काम करत असताना तेथील रिसेप्शनिस्टला त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर सर्वांसमोर पतीला मारहाण केली. सर्वासमोर पतीचा अपमान झाल्याच्या तणावामुळे महिलेने सुसाईड नोट लिहित घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. बिबवेवाडीपोलिसांनी तिच्या जीम ट्रेनर प्रियकर पती पत्नीला अटक केली असून डॉक्टर महिलेसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोनाली गौरव धुर्डे (वय ३४, रा. विघ्नहर नगर, रणधीर हाऊस, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सचिन मोहन जुन्नरकर (३८), अश्विनी सचिन जुन्नरकर (३३, दोघे रा. ढमाले कॉम्प्लेक्स सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश राजेंद्र अंबिलवादे, निता महेश अंबिलवादे (रा. गुजरवाडी, कात्रज) आणि डॉ. अमिता ढेकणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बिबवेवाडीतील विघ्नहर नगरमधील रणधीर हाऊस येथे २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते २८ एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली. याबाबत मोनाली यांच्या पतीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीम ट्रेनर म्हणून सचिन जुन्नरकर म्हणून काम करतो, त्याच ठिकाणी मोनाली धुर्डे ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम पहात होती. सचिन जुन्नरकर याने जीममध्ये काम करत असताना मोनाली हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विवाह झाला असतानाही मोनाली त्याच्या बोलण्यावर मोहीत होऊन प्रेमात वाहत गेली. त्यातून तो तिला त्रास देत देऊ लागला. सचिन जुन्नरकर, अश्विनी जुन्नरकर व इतर आरोपी हे त्यांच्या घरात अनाधिकृतपणे शिरले. त्यांनी मोनाली व तिच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली. सर्वांसमोर फिर्यादी व त्यांची पत्नी मोनाली यांना अपमानित केले. फिर्यादी व मोनाली पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल यादी दिली. ते उपचार करुन दोघे घरी गेले. दरम्यान, इतर आरोपींनी मोनाली हिला फोन करुन तु पोलिसांकडे तक्रार देऊ नको, नाही तर वाईट परिणाम होतील, असे धमकावले होते. त्यातून मोनालीचा मानसिक ताण वाढला. रात्री फिर्यादी हे झोपले असताना मोनाली हिने सुसाईड नोट लिहून घरी मुलाला झोका खेळण्यासाठी छताच्या हुकाला आधी लावलेल्या दोरीला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. माझ्यामुळे माझ्या पतीला अपमानित व्हावे लागले. या प्रकाराला मीच जबाबदार आहे, असे मोनाली हिने चिठ्ठीत लिहिले होते. सर्वांसमोर मारहाण करुन लोकांसमोर झालेला अपमान तिला सहन झाला नाही, त्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : पुणे: पति के अपमान के बाद रिसेप्शनिस्ट ने की आत्महत्या; जिम ट्रेनर गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक रिसेप्शनिस्ट ने पति के अपमान के बाद आत्महत्या कर ली। जिम ट्रेनर प्रेमी द्वारा पति की पिटाई से तनाव में थी। सुसाइड नोट लिखकर जान दी। पुलिस ने ट्रेनर और अन्य को गिरफ्तार किया, छह पर मामला दर्ज।

Web Title : Pune: Receptionist Ends Life After Husband's Humiliation; Gym Trainer Arrested

Web Summary : A Pune receptionist committed suicide after her husband was publicly assaulted by her gym trainer lover. Facing immense stress and humiliation, she left a suicide note. Police arrested the trainer and others, filing charges against six people.