खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ ची घटना; मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ४ वर्षीय बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:06 IST2026-05-18T13:05:24+5:302026-05-18T13:06:56+5:30

अपघातात रिक्षा चालकासह त्यांची पत्नीदेखील गंभीर जखमी झाली असून नागरिकांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मद्यपी कार चालकाला पकडले

Hit and run incident in Khadakwasla; 4-year-old boy dies after being hit by drunk driver | खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ ची घटना; मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ४ वर्षीय बालकाचा मृत्यू

खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ ची घटना; मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ४ वर्षीय बालकाचा मृत्यू

पुणे : मद्यधुंद कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना खडकवासल्यातील भाजी मंडईजवळ असलेल्या बसस्टॉपजवळ शनिवारी (दि.१६) सायंकाळी घडली. भरधाव कारच्या धडकेत रिक्षामधील चारवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अपघातात रिक्षा चालकासह त्यांची पत्नीदेखील गंभीर जखमी झाली. नागरिकांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मद्यपी कार चालकाला पकडले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी कार चालकाला अटक केली.

यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा. धायरी), असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. अपघातात रिक्षा चालक नीलेश कांबळे (वय ३६) आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मद्यधुंद कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३६, रा. अहिल्यानगर) याला अटक केली.

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश कांबळे हे भाजीपाला विक्रेते आहेत. खडकवासला भागात ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिक्षा चालक कांबळे, त्यांचा मुलगा यशराज आणि पत्नी हे खडकवासल्यातून पुण्याकडे निघाले होते. खडकवासला भाजी मंडई परिसरात भरधाव कारने रिक्षा चालक कांबळे यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाला कारने धडक दिली. अपघातानंतर कार न थांबवता अमोल गेगडे हा पसार होण्याच्या तयारीत होता.

अपघातानंतर खडकवासला भाजी मंडई परिसरात नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी पाठलाग करून कार चालक अमोल याला पकडले. नागरिकांनी त्याला चोप दिला. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या यशराजसह त्याच्या आई-वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यशराजचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक कसबे पुढील तपास करत आहेत.

Web Title : खडकवासला में हिट एंड रन; नशे में धुत चालक ने बच्चे को कुचला

Web Summary : खडकवासला में एक नशे में धुत ड्राइवर ने कई वाहनों को टक्कर मार दी, जिसमें एक चार वर्षीय बच्चे की मौत हो गई। नागरिकों ने ड्राइवर को पकड़कर पुलिस को सौंप दिया। बच्चे के माता-पिता भी गंभीर रूप से घायल हो गए।

Web Title : Drunk Driver Kills Child in Khadakwasla Hit-and-Run Incident

Web Summary : A drunk driver in Khadakwasla hit several vehicles, fatally injuring a four-year-old boy. The driver was caught by citizens and handed over to the police. The child's parents were also seriously injured.