शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्लॅस्टिक मुक्तीसाठी शाळांची घेणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 1:46 PM

प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना जोडून घेणार

ठळक मुद्देमुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणार

पुणे : शासनाने प्लॅस्टिक वापरावर बंदी घातल्यानंतर पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. यासोबतच शहरातील प्लॅस्टिक गोळा करून ते पुन:प्रक्रिये करिता पाठविले जाते. पालिकेसोबत ‘सागरमित्र’ नावाची संस्था यासंदर्भात काम करीत आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या कामासाठी आता शहरातील पालिका आणि खासगी अशा एकूण ८०० शाळांची मदत घेतली जाणार आहे. सुरुवातीला मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना या कामामध्ये जोडून घेतले जाणार आहे.प्लॅस्टिकबंदीनंतर प्लॅस्टिक गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. सागरमित्र ही संस्था गोळा केलेले प्लॅस्टिक पुन:प्रक्रिया करून वापरात आणते. आता शहरातील खासगी आणि पालिकेच्या शाळांमधून प्लॅस्टिक गोळा करण्याची नवी कल्पना मांडण्यात आली आहे. या शाळांना सहभागी करून घेण्यासाठी सुरुवातीला मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरामधील प्लॅस्टिक गोळा करून आणायचे. हे प्लॅस्टिक शाळांमध्ये जमा करायचे. दर शनिवारी हे प्लॅस्टिक पालिका शाळांमधून गोळा करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मुलांनाही प्रदूषणमुक्तीसाठी राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळणार असून, त्यांना प्लॅस्टिकचा वापर न करण्याची सवय लागेल. शहरातील ८०० शाळांमधून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक गोळा होऊ शकणार आहे.......पालिकेच्या आणि खासगी शाळांची बैठकसुरुवातीला पालिकेच्या ५० आणि ५० खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे मुख्याध्यापक त्यांच्या शाळांमधील प्रत्येकी दोन शिक्षकांना या उपक्रमात सहभागी करुन घेणार आहेत. त्यांनाही प्रशिक्षित करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने १ हजार ६०० शिक्षकांना या उपक्रमात सहभागी करून उद्दिष्ट असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.....‘सागरमित्र’ संस्थेची संकल्पनासागरमित्र या संस्थेने ही संकल्पना मांडली होती. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी संस्थेसोबत हा प्रयोग कोल्हापूरच्या शाळांमध्ये यशस्वीरित्या राबविला. त्यानंतर सोलापूर आणि अन्य महापालिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर पुणे महापालिकाही हा उपक्रम राबविणार असल्याचे मोळक यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाPlastic banप्लॅस्टिक बंदी