शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात मिळणार ‘अ‍ॅप’द्वारे मदत

By admin | Updated: April 18, 2017 02:53 IST

महामार्गावर तसेच दुर्गम ठिकाणी अपघात घडल्यास तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. भारतात अशा घटनांची संख्या जास्त आहे.

गोरख माझीरे , भुगावमहामार्गावर तसेच दुर्गम ठिकाणी अपघात घडल्यास तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. भारतात अशा घटनांची संख्या जास्त आहे. अशाच एका घटनेत आपल्या भावाला गमावलेल्या एका बहिणीने अशी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी ‘फार्इंड नीअरबाय प्लेस’ अ‍ॅप तयार करून भावाला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या अ‍ॅपद्वारे जवळच्या ठिकाणावरून तातडीने मदत मिळवणे शक्य होणार आहे. भुगाव येथील रहिवासी नयन चौंधे असे या तरुणीचे नाव आहे. नयन हिचा भाऊ मंदार चोंधे याचा २०१३ मध्ये पंढरपूर येथे जात असताना अपघात झाला होता. त्या वेळी जवळील हॉस्पिटल सापडत नव्हते. रात्रीची वेळ असल्याने विचारण्यासाठीही कोणीही नव्हते. तेथून त्याला ३० किमी अंतरावर एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. वेळीच उपचार मिळाले असते तर मंदार आज आपणा सर्वांसोबत असला असता. अशी वेळ कोणावर येऊ नये, म्हणून तिने हे अ‍ॅप करायचे ठरवले. गुगल डेटाचा वापर करून तिने हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे आपण ज्या ठिकाणी असू त्याच्या पाच किलोमीटर परिघातील दवाखाने, हॉटेल्स, एटीएम आदी महत्त्वाची ठिकाणे, संपर्क क्रमांक तसेच त्या ठिकाणी जाण्याचा रूट मॅप असणार आहे. यामुळे तातडीची मदत मिळणे शक्य होणार आहे. हे अ‍ॅप गुगल स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते. नयन हिने मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातून आपले इंजिनिअरिंग पूर्ण केले. तिचे वडील सुतारवाडी येथील खासगी केबल कंपनीत काम करतात. सध्या अनेक उत्कृष्ट अशा सॉफ्टवेअर, वेबसाईट ती घरीच तयार करीत आहे. या अ‍ॅपची आदर्श ग्रामपंचायत भुगाव यांनी दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडूकाका करंजावणे, विद्यमान सरपंच सचिनभाऊ मिरघे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, ग्रा. पं. सदस्य मधुकर गावडे, दत्तात्रय करंजावणे, युवानेते अक्षय सातपुते, प्रदीप शेडगे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला व अ‍ॅपची प्रशंसा करून नयनचे कौतुक केले.