शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शुल्क कपातीचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:05 IST

ग्रंथालय, प्रयोगशाळा डिपॉजिट, कॉलेज मॅक्झीन,इंडस्ट्रीयल व्हिजिट शुल्क केले कमी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासन निर्देशानुसार संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 650 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणते व किती शुल्क आकारावे व कोणते आकारू नये, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

कोरोनामुळे पुण्यासह राज्यभरातील महाविद्यालये सुमारे दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ आॅनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांकडून दिल्या जाणा-या विविध सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नसल्याने महाविद्यालयीन शुल्कात कपात करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती. राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांच्या शुल्कात कताप करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली. परंतु, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या शुल्काबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.

शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.डॉ.व्ही.बी.गायकवाड व डॉ.संजय चाकणे हे या समितीचे सदस्य होते.या समितीने दिलेल्या अहवालानंतर विद्यापीठाने शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला.
------------------------------
 विद्यापीठाने कोणत्या शुल्कात केली कपात
 
शुल्काचा  प्रकार                             कमी केलेल्या शुल्काची टक्के
 लायब्ररी                                                     ५०
लॉयब्रोटोरी                                                  ५०
जिमखाना                                                   ५०
स्टुडेंट वेलफेअर                                           ७५
परीक्षा                                                        २५
इंडस्ट्रीयल व्हिजिट                                    १००
कॉलेज मॅक्झीन                                         १००
डेव्हलपमेंट फंड                                         २५
लॉयब्रोटोरी डिपॉजिट                                 १००
इतर डिपॉजिट                                            १००
हेल्थ चेकप                                                १००
डिझास्टर मॅनेजमेंट                                   १००
अश्वमेध                                                    १००
कॉम्प्युटर सुविधा                                     ५०
----------------------------
शासनाने विद्यापीठांना शुल्क कपातीचे आदेश दिले होते. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाच्या धरतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुक्लात कपात केली आहे. ट्युशन शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही.तसेच आॅक्टोबरपासून महाविद्यालये नियमितपणे आॅफलाईन पध्दतीने सुरू झाले तर  विद्यार्थ्यांकडून पूर्वी प्रमाणे उरर्वरित महिन्यांसाठीचे शुल्क नियमानुसार आकारता येणार आहेत.
 - सुधाकार जाधवर, सदस्य,व्यस्थापन परिषद ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------------------------
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या
 पुणे : ३८८
अहमदनगर : १३१
नाशिक : १५८ 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षण