शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Raut: भाजपने लावलेल्या सवयीमुळेच सरकार अडचणीत; वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:59 IST

महावितरणवर ५६ हजार कोटींचा बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार

पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत असल्याचे ते म्हणाले आहेत. तर वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार असेही त्यांनी यावेळी संगितले आहे. पुण्यात बावधन येथे नाना पटोले यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राऊत म्हणाले, वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते. विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागते, त्यासाठी बँकेला व्याज द्यावे लागते. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे.

''मी जेव्हापासून या खात्याचा पदभार सांभाळला तेव्हापासून २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळाच्या, अतिवृष्टीच्या काळातही हा प्रयत्न केला. मुंबई अंधारात असतानाही सातत्याने वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला याकडे कुणाचाही लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषीपंप, विजजोडणीचा कार्यक्रम आणला. भरलेल्या वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही संबंधित जिल्ह्याला दिली जाते. त्यातून विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकता, नवीन ट्रान्सफॉर्मर घेता येऊ शकतात, नवीन लाईन टाकता येते तर मग विजेचे बिल का भरत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महावितरणवर ५६ हजार कोटींचा  बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार. त्यामुळे लोकांना वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी