शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा पूर्ण कच्चाचिठ्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:53 IST

- लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं.

- किरण शिंदेपुणे - शहरातील शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. हा तरुण गौरव मनोज अहुजा असून, त्याच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्याने मोबाईल बंद केला असून कुटुंबासह पोलीस त्याचा शोध घेत आहे. अशात हा तरुण कोण आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे. 

रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?

फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने  क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही “माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर माझ्या तोंडावर केली आहे, त्याच्या वर्तनाची मला लाज वाटते…” हे उद्गार आहेत मनोज अहुजा यांचे, जे स्वतः या प्रकरणात जबाबदारी स्वीकारत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून, तरुणाचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांनीही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.कायदा सर्वांसाठी समान! अशा माजोरड्यांवर कठोर कारवाई होणार का?या प्रकारानंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका शहराच्या शिस्तीचा असा भंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य वर्तन करणं हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी या मद्यधुंद माजोरड्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडYerwadaयेरवडाArrestअटक