पुणे : पोटच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला विशेष न्यायालयाने (पोक्सो) दोषी ठरवत वीस वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी बुधवारी हा निकाल दिला. न्यायालयाने पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
ही घटना मे २०१८ मध्ये हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलगी घरात एकटी असताना नराधम बापाने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली होती. मात्र, मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर १४ मे २०१८ रोजी आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ मे २०१८ रोजी नराधम पित्याला अटक केली होती. सरकारी वकील लीना पाठक यांनी न्यायालयात बाजू मांडली. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि पीडितेची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपी गेल्या ७ वर्षे, ११ महिने आणि २० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता, हा कालावधी त्याच्या शिक्षेतून वगळला जाणार आहे. तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. खटल्यासाठी हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार संभाजी शशिकांत म्हांगरे यांनी कोर्ट मदतनीस म्हणून काम केले.
Web Summary : Pune court sentenced a father to 20 years for raping his 13-year-old daughter in 2018. The court also imposed a fine of ₹50,000 and directed compensation for the victim's rehabilitation. He threatened her to silence, but the mother reported him.
Web Summary : पुणे की अदालत ने 2018 में अपनी 13 वर्षीय बेटी के साथ बलात्कार करने के आरोप में एक पिता को 20 साल की सजा सुनाई। अदालत ने ₹50,000 का जुर्माना भी लगाया और पीड़िता के पुनर्वास के लिए मुआवजे का निर्देश दिया। उसने चुप रहने की धमकी दी, लेकिन माँ ने उसकी रिपोर्ट दर्ज कराई।