शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

‘गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक असलेले डॉ. बळवंत घाटपांडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 17:37 IST

विशेष म्हणजे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती.

ठळक मुद्देआपल्या उत्पन्नातील वाटा सामाजिक संस्थांना देत संवेदनशील मनाचे घडविले दर्शन‘मधुमेहासह यशस्वी जीवनाचे शिल्पकार’ असा गौरव

पुणे : ’ गरीबांचे डॉक्टर’ असा नावलौकिक मिळविलेले शहरातील सर्वांत जुने वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू, नातसून असा परिवार आहे. विशेष म्हणजे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती.घाटपांडे हे ‘गरीबांचे डॉक्टर’  म्हणून प्रसिद्ध होते. कणखर प्रकृतीच्या डॉ. घाटपांडे यांनी आपल्या उत्पन्नातील वाटा सामाजिक संस्थांना देत संवेदनशील मनाचे दर्शन घडविले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या घाटपांडे यांचा डायबेटिक असोसिएशन पुणे शाखेने ‘मधुमेहासह यशस्वी जीवनाचे शिल्पकार’ असा गौरव केला होता. आखीव रेखील दिनचर्या, सात्विक आहार आणि नियमित व्यायाम यामुळे त्यांना दीघार्युष्य लाभले. घाटपांडे यांचा जन्म १५ मार्च १९१५ रोजी जुन्नरजवळील आळे या गावी झाला. फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. सरस्वती मंदिर रात्र प्रशाला येथून शिक्षण घेऊन ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. स. प. महाविद्यालयातून प्रिव्हीयसची परीक्षा देऊन त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथून ‘एलसीपीएस’ (लायसेन्सिएट इन मेडिकल अँड सर्जिकल) ही पदवी घेतली. १९४१ मध्ये डॉक्टर म्हणून ते शासकीय सेवेत दाखल झाले. १९४८ पासून त्यांनी कसबा पेठेत स्वत:चा दवाखाना सुरू केला. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा केली.  .............................

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरDeathमृत्यू