शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगची क्रेझ ओसरली!

By admin | Updated: July 7, 2015 04:51 IST

शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तब्बल ५० टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरकलेच नसल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा काही वर्षांपासून रिक्त राहत असल्याचे दिसून येत असताना आता चालू शैक्षणिक वर्षात शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तब्बल ५० टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरकलेच नसल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. त्यावरून दिवसेंदिवस इंजिनिअरिंगची क्रेझ कमी होत असल्याचे दिसून येत आहे.राज्य तंत्र शिक्षण विभागातर्फे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील दिलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ६५ हजार जागांसाठी केवळ १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान डीटीईतर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशपक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २ जुलै ते ५ जुलै या कालावधीत प्रवेश घेणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला; परंतु अनेक महाविद्यालयांतील ५० टक्के जागा रिक्त आहेत. अभियांत्रिकी कॉलेज आॅफ पुणे (सीओईपी), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), पुणे इस्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) तसेच एमआयटी या अधिक मागणी असलेल्या महाविद्यालयांचा समावेश आहे.सीओईपी, व्हीआटी या दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, अशी राज्यातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याची इच्छा असते. मात्र, सोओईपीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश दिलेल्या ६६२ जागांपैकी केवळ ३४९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हीच परिस्थिती शहरातील इतर नामांकित महाविद्यालयांमधील आहे. अभियांत्रिकी आणि आयआयटीमधील प्रवेशप्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने बरेच विद्यार्थी आयआयटीला प्राधान्य देत आहेत. तसेच, काही विद्यार्थी सध्या फारशी मागणी नसलेल्या शाखेत प्रवेश न घेता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला अधिक प्राधान्य देत आहेत. एकदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्यांदा प्रवेश घेण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी दुसऱ्या फेरीनंतर प्रवेश घेतील, असे सीओईपीच्या प्रवेशप्रक्रियेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.४अभियांत्रिकी कॉलेज आॅफ पुणे (सीओईपी), विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), पुणे इस्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) तसेच एमआयटी या महाविद्यालयांचा समावेश आहे.