पुणे : महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वेगाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे दुर्लक्ष करून फारशी मागणी नसलेली पुणे-जबलपूर रेल्वेसेवा सुरू करणारे केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे की जबलपूरचे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे सोमवारी केला आहे.
पुणे-जबलपूर विशेष रेल्वे सेवेला आमचा विरोध नाही. पण, पुणेकरांच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या मागण्या दुर्लक्षित करून जबलपूरसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याचा भाजप सरकारचा अट्टाहास कशासाठी आहे?, त्यांना कोणाचे राजकारण साधायचे आहे? असे प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत आहे शिवाय उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरून सोडल्या जात आहेत. हा भेदभाव धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे पुण्यातील प्रवासी कोल्हापूर, मुंबई भागात पुणे स्थानकावरून जात असताना त्यांना त्यासाठी हडपसरला जायला लावण्याचा आटापिटा त्रासदायक आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक आणि पुणे ते संभाजीनगर अशा जास्त वर्दळीच्या मार्गावर जास्त गाड्या सुरू व्हाव्यात, अशी महाराष्ट्रातील लोकांची मागणी आहे. या मागणीकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष आहे. पुण्यातील रेल्वेसेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणेकर अनेक वर्षे करीत आहेत. पुणे-लोणावळा लोकल सेवा विस्कळीत आहे. त्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. मेट्रो असो, अथवा रेल्वे भाजपच्या सरकारकडून गेली १२ वर्षे पुणेकरांवर अन्यायच होत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.
Web Summary : Congress criticizes prioritizing Pune-Jabalpur train over Maharashtra's needs. They question BJP's motives, citing neglected local routes and terminal shifts, accusing them of disadvantaging Pune passengers for political gain.
Web Summary : कांग्रेस ने महाराष्ट्र की ज़रूरतों को दरकिनार कर पुणे-जबलपुर ट्रेन को प्राथमिकता देने की आलोचना की। उन्होंने बीजेपी के इरादों पर सवाल उठाते हुए स्थानीय मार्गों और टर्मिनल बदलावों की उपेक्षा का हवाला दिया, और पुणे के यात्रियों को राजनीतिक लाभ के लिए नुकसान पहुंचाने का आरोप लगाया।