दौंड : दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील (वय ९१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या दौंड तालुक्यातील पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे दोन मुलं, मुली, सुना, नातवंडे परतवंडे असा परिवार आहे. दिवंगत आमदार कृष्णराव जगदाळे पाटील यांच्या पत्नी तर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, विद्यमान नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांच्या मातोश्री तर नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदळे यांच्या त्या आजी होत्या.
(नगराध्यक्षा ते आमदार)
दौंड तालुक्यातील खानवटे येथील राजेभोसले या राजघराण्यातला त्यांचा जन्म. इयत्ता दहावी पर्यंत इंग्लिश माध्यमात शिकलेल्या उषा देवींचे मराठी गुजराती इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. दौंडचे पाटील कृष्णराव जगदाळे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या राजकीय आणि सामाजिक कामकाजात सक्रिय झाल्या. दरम्यान दौंड नगर परिषदेच्या त्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा होत्या. त्यानंतर १९७२ ते ७७, १९८५ ते ९० अशी १० वर्ष काँग्रेसच्या आमदार होत्या. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आमदारकी म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांच्या कारकीर्दीत कुरकुंभ औद्योगिक वसाहत, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ आणि ७, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, केडगाव रेल्वे स्टेशन इत्यादी वास्तु त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाल्या. तसेच दौंड -पुणे रेल्वे शटल सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. खोर सारख्या दुर्गम भागात त्यांनी सरस्वती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक अनुशेष भरून काढला आहे.
Web Summary : Former Daund MLA Ushadevi Jagdale, 91, passed away after a brief illness. She was Daund's first female MLA and served in multiple Congress governments. Her contributions included establishing industrial areas, police facilities, and improving rail transport. She is survived by her family.
Web Summary : दौंड की पूर्व विधायक उषादेवी जगदाले (91) का निधन हो गया। वह दौंड की पहली महिला विधायक थीं और उन्होंने कई कांग्रेस सरकारों में सेवा की। औद्योगिक क्षेत्रों, पुलिस सुविधाओं की स्थापना और रेल परिवहन में सुधार में उनका योगदान था। उनके परिवार में सदस्य हैं।