शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमध्ये डॉक्टरांकडून निर्दयी कृत्य! प्रसुती दरम्यान महिलेला मारहाण, घटनेच्या ३ दिवसानंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 21:11 IST

बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या गरोदर महिलेला प्रसुती होताना डॉक्टरांनी अमानुष मारहाण केल्याची घटना यवत मध्ये घडली आहे.

ठळक मुद्देनातेवाईक महिलेच्या तब्बेतीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ शकत नव्हतेपुण्याच्या यवतमधील धक्कादायक घटना

यवत : बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या गरोदर महिलेला प्रसुती होताना डॉक्टरांनी अमानुष मारहाण केल्याची घटना यवत मध्ये घडली आहे. याबाबत तीन दिवसांनी महिलेने पोलिसांना तक्रार दिल्यानंतर काल (दि.१६) रोजी रात्री संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदर असलेल्या पूजा गोरख दळवी (वय - २६, रा.खामगाव , दळवी वस्ती , ता.दौंड) यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता यवत येथील जयवंत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना प्रसुती दरम्यान महिलेच्या तोंडावर, हातांवर ,डोक्यावर, मांडीवर, ओठांवर, चापटाने व बुक्याने मारहाण केली. यामुळे संबंधित गरोदर महिलेच्या चेहऱ्यावर काळ्या निळ्या रंगाचा जखमा झाल्या असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नातेवाईक महिलेच्या तब्बेतीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ शकत नव्हते                तत्पूर्वी काल सायंकाळी संबंधित मारहाण झालेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यानंतर खामगाव मधील दोनशे ते तीनशे लोक यवत येथील जयवंत हॉस्पिटल समोर गर्दी केली होती. गुरुवार (दि.१४) रोजी बाळंत होत असताना बेदम मारहाण झालेली असताना त्यांचे कुटुंब बाळंत महिलेच्या तब्बेतीच्या भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ शकत नव्हते. असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी गावातील काही पुढारी व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांचा रोष आणखीच वाढत होता. संबंधित ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे यवत पोलिसांचा समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमवला पांगविले.

यानंतर रात्री पीडित महिलेच्या पतीचा जबाब नोंदविण्यात आला. सदर जबाब घेताना काही नातेवाईकांनी हरकत घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. संबंधित गुन्हा दाखल करताना आलेला राजकीय दबाव , पोलिसांची टाळाटाळ व नंतर यवत ग्रामीण रुग्णालयात  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील महिलेची तपासणी करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.       डॉक्टर म्हणतात घटना अपघाताने घडली

जयवंत हॉस्पिटलचे डॉ.चैतन्य भट यांना विचारले असता ते म्हणाले , संबंधित महिलेची प्रसुती नैसर्गिक होणे काहीसे अडचणीचे होते. मात्र मी माझ्या अनुभवावरून ती प्रयत्न केल्यास नैसर्गिक होईल याची खात्री मला वाटली होती. त्यासाठी मी प्रसुती कक्षात सर्वोतोपरी प्रयत्न केले. ते करत असताना महिलेच्या वाढत्या हालचाली मुळे व्यत्यय येत होता.  महिलेला आवरत असताना मी घसरून पडलो यावेळी माझा कोपर तिच्या डोळ्याजवळ लागला. महिलेची प्रसूती नैसर्गिक व सुखरूप झालेली आहे. ही माझ्यासाठी महत्वाची बाब आहे. घडलेली घटना अपघाताने घडली आहे.

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकdocterडॉक्टर