शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगसाठी पैसे घेतल्यास मॉल, मल्टिप्लेक्सवर खंडणीचा गुन्हा : अमोल बालवडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 20:25 IST

शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते.

ठळक मुद्देनागरिकांनी पार्किंगसाठी पैसे घेणाऱ्या मॉलवर बहिष्कार टाकावापार्किंग शुल्काबाबत सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त

पुणे: शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे बेकायदेशीरपणे पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळल्यास संबंधित मॉल, मल्टिप्लेक्स चालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येतील अशी स्पष्ट भूमिका महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी येथे घेतली. दरम्यान पार्किंगसाठी पैसे घेणाऱ्या मॉलवर नागरिकांनी देखील बहिष्कार टाकावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.    महापालिकेच्या शहर सुधारण समितीच्या बैठकीत शहरामधील मॉल, मल्टिप्लेक्स नागरिकांना पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात आकरण्यात येत असलेल्या पार्किंग शुल्काबाबत सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर समितीच्या बैठकीत शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्सने नागरिकांसाठी मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असा ठराव करण्यात आला. तसेच पार्किंग शुल्क घेणा-या मॉलला नोटीसा देण्याचे आदेश देखील समितीने महापालिका प्रशासनाल दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्क घेणा-या मॉल, मल्टिप्लेक्सला नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे.     या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मॉल, मल्टिप्लेक्सकडून आकारण्यात येणा-या पार्किंग शुल्काबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट केली. बालवडकर यांनी सांगितले की, शहरातील मॉलला कोणत्याही कायद्यानुसार पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार नाही. परंतु अधिकार नसताना नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंक पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते. याबाबत आता महापालिकेने कडक धोरण अवलंबिण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील मॉल असे पार्किंग शुल्क घेत असतील नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहन बालवडक यांनी केले. तसेच अधिकार नसताना नागरिकांकडून पैसे घेणा-या मॉलच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय देखील झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    दरम्यान महापालिका मॉल, मल्टिप्लेक्सवर कारवाई करणारच आहे. परंतु नागरिकांनी देखील अशा मॉलवर बहिष्कार टाकल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, असे बालवडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस