शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित हुक्का प्लेवर्स विकणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात प्रतिबंधीत असलेले हुक्का प्लेवर्स कायदेशीर असल्याचे भासवून त्याची सर्रासपणे विक्री करणाऱ्या शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात प्रतिबंधीत असलेले हुक्का प्लेवर्स कायदेशीर असल्याचे भासवून त्याची सर्रासपणे विक्री करणाऱ्या शहरातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील ८ हुक्का पार्लरवर प्रतिबंधीत हुक्का फ्लेवर्स व बेकायदेशीर तंबाखुजन्य पदार्थ, विदेशी सिगारेटची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचा तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर्स, वैधानिक इशारा नसलेले सिगारेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध दारु, गुटखा विक्री, जुगार खेळणे व अन्य अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील हुक्का पार्लरमध्ये हर्बल हुक्काच्या नावाखाली प्रतिबंधीत हुक्का प्लेवर्सची विक्री केली जात असल्याची खबर पोलिस आयुक्त गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर व विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी विविध पोलिस ठाण्यातील नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी यांच्या पथकाने कोरेगाव पार्क, स्वारगेट, चतुःशृंगी, लष्कर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई केली.

स्मोक्‍स चॉकलेट, कलंदर, लिटील गोवा, लष्कर परिसरात शिशा डेन, दिश्‍मा एंटरप्रायझेस, लाल देऊळ सोसायटी, सॅलिसबरी पार्कमधील इसेन्शीअल स्मोक स्टोअर, औंधच्या परिहार चौकातील स्मोकर वर्ल्ड शॉप या दुकानांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. संबंधीत ठिकाणी अफजल, रॉयल ब्रॅंड, अलफकीर, अल्लाऊद्दीन, महाराज, अलमलिका, अलअहयान, ऍपलपफ, मिस्टर हुक्का, हर्बल सोएक्‍स, हर्बल मोल्यासोएस अशा वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का प्लेवर्स, त्यासोबत लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले

--