शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पुणे शहराला पीएम केअरमधून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 23:17 IST

CoronaVirus News : पुण्यामध्ये मुळातच व्हेंटिलेटरची कमतरता आहे. आजच केंद्र सरकारकडून शहरासाठी १६५ नवे व्हेंटिलेटर देण्याची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देआज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ससूनच्या डीनने ही बाब मांडली.

पुणे : पुणे शहरात आयसीयु बेड्सच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता शहराला कोरोनाच्या साथीत मिळालेले पीएम केअरचे जवळपास ५८ व्हेंटिलेटर हे खराब झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कोरोना लढ्यात महत्वाचे असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे रुग्णालयावर आता उरलेल्या व्हेंटिलटरवर कसंबसं भागवायची वेळ आली आहे. 

पुण्यामध्ये मुळातच व्हेंटिलेटरची कमतरता आहे. आजच केंद्र सरकारकडून शहरासाठी १६५ नवे व्हेंटिलेटर देण्याची घोषणा करण्यात आली. हे व्हेंटिलेटर येई पर्यंत उपलब्ध सर्व व्हेंटिलेटर भरलेले आहेत. मात्र त्यातच गेल्या वर्षभरात आलेले हे व्हेंटिलेटर खराब झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती ससुन मध्ये निर्माण झाली आहे. 

आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ससूनच्या डीनने ही बाब मांडली. याविषयी बोलताना ससूनचे एक कर्मचारी म्हणाले “ पीएम केअरचे व्हेंटिलेटर आले होते. त्यापैकी ६०-७०  टक्के व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. सध्या आम्ही इतरांकडून मिळालेल्या व्हेंटिलेटरवर काम चालवत आहोत. सध्या ससुन मध्ये ८७ व्हेंटिलेटर असून ते सर्व आता वापरात आहेत”

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस