शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : 'टायटर' चाचणीशिवाय होतेय प्लाझ्मा दान; अँटीबॉडीचे प्रमाण समजेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:02 IST

भारतात कुठेच टायटर चाचणी होत नसल्याने ही अट रद्द करण्याची मागणी रक्तपेढ्या व वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देभारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) घातलेल्या अटीचे करावे लागत आहे उल्लंघन

राजानंद मोरे-पुणे : प्लाझ्मा दान करण्यापुर्वी कोरोनामुक्त व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीचे प्रमाण मोजण्यासाठी 'टायटर' चाचणीची अट घालण्यात आली आहे. मात्र, या चाचणीसाठी कीट उपलब्ध नसल्याने सध्या केवळ रक्तामध्ये कोरोनाविरोधी अँटीबॉडी आहेत की नाही, हे पाहिले जात आहे. त्यानंतर प्लाझ्मा रुग्णाला दिला जात आहे. पण त्यामुळे भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) घातलेल्या अटीचे उल्लंघन करावे लागत आहे. भारतात कुठेच टायटर चाचणी होत नसल्याने ही अट रद्द करण्याची मागणी रक्तपेढ्या व वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे.भारतात सध्या प्लाझ्मा थेरपीच्या अनेक ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. या थेरपीमुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मागणीही वाढू लागली आहे. पण ही थेरपी अद्याप संशोधन पातळीवरच असल्याने 'डीसीजीआय'ने काही बंधने घातली आहेत. त्यामध्ये 'टायटर' चाचणी करणे आवश्यक असल्याचे मागर्दशक तत्वात म्हटले आहे. या चाचणीद्वारे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये १:६४० यापेक्षा जास्त प्रमाणात अँटीबॉडी असतील तर ते रुग्णाला द्यावे, असे म्हटले आहे. पण ही चाचणी सध्या केवळ राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) मध्ये होते. त्यामुळे ससूनसह अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ही चाचणी करणे शक्य होत नाही.-----------------धोका नाही'टायटर 'चाचणीसाठी स्वतंत्र कीट व मशीन असते. ते भारतात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या अँटीबॉडी आहेत की नाही, हे पाहिले जात आहे. तसेच एका मशिनद्वारे अँटीबॉडी किती असाव्यात, याचा सर्वसाधारण अंदाज घेतला जात आहे. पण हे प्रमाण टायटर चाचणीप्रमाणे आहे की नाही हे सांगता येणार नाही. असे असले तरी कोरोनाविरोधी अँटीबॉडी तयार झालेल्या असल्याने त्याचे प्रमाण समजले नाही तरी रुग्णाला फायदाच होतो. त्याचा रुग्णांना काहीच धोका नाही, असे एका खासगी रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुखांनी सांगितले.-----------------टायटर अभावी अडसरअँटीबॉडीची टायटर चाचणीची अट घालण्यात आल्याने सुरूवातीला 'एनआयव्ही'मधून ही चाचणी करण्यात आली. पण सध्या 'एनआयव्ही'वरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तिथे तीन आठवड्यांहून अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध एका मशिनद्वारे आतापर्यंत जमा झालेल्या प्लाझ्माचे सर्वसाधारण प्रमाण मोजले जात आहे. त्याशिवाय रुग्णांना प्लाझ्मा देता येत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचे एका रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुखांनी सांगितले.-----------------'टायटर' चाचणी उपलब्ध नसल्याने 'आयसीएमआर'कडून प्रत्येक प्लाझ्माचा नमुना साठवून ठेवायला सांगितला आहे. त्यांच्याकडून नंतर त्याची चाचणी केली जाईल, असे म्हटले आहे. पण अद्याप चाचणी झालेली नाही. सध्या 'आयजाजी' चाचणीतून अँटीबॉडी आहेत की नाही हेच पाहिले जात आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम आहे. टायटर चाचणी नसल्याने ही अट काढून टाकण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठपुरावा केला जात आहे.- डॉ. अतुल कुलकणी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर