शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीत कोरोनाचा पहिला बळी; प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:35 IST

त्याच्या कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नाती कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट

ठळक मुद्दे कोरोनाच्या पहिल्या बळीने प्रशासन अधिक अ‍लर्ट

बारामती : बारामती शहरात आढळलेल्या दुसऱ्या कोविड-१९ संक्रमित रुग्णाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. बारामती शहरातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्याच्या कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नाती कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या सर्वांवर पुणे शहरातील नायडू रुग्णालय , ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत . समर्थनगर येथील या भाजी विक्रेत्याला रविवारी (दि. ४ )कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्याच्यावर उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे .दरम्यान 29 मार्च रोजी शहरात श्रीरामनगर येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र भाजी विक्रेत्याला अर्धाग वायूचा आजार होता .त्यातच प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे .या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या कुटुंबातील 16 जणांना सोमवारी(दि ६) रात्री ,तर त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या दोघा डॉक्टर,एक्सरे टेक्नीशियन आणि एका नर्सला मंगळवारी(दि ६)दुपारी तपासणीसाठी नेण्यात आले होते .त्यापैकी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मिळालेल्या अहवालानसुार, मंगळवारी मुलगा आणि सुनेसह १ आणि ८ वर्षाच्या नातीला संसर्ग झाल्याचे बुधवारी(दि ८) मिळालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. आज गेलेल्या कोरोनाच्या पहिल्या बळीने प्रशासन अधिक अ‍लर्ट झाले आहे.शहरात खळबळ उडाली आहे . 

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस