Corona virus : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ; ४१५ जण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 08:35 PM2021-03-01T20:35:19+5:302021-03-01T20:37:41+5:30

आज विविध प्रयोगशाळांमध्ये ४ हजार ८१५ तपासण्या करण्यात आली.

Corona virus : Comfortable! 406 corona patients increasing in Pune on Monday; 415 were released | Corona virus : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ; ४१५ जण झाले कोरोनामुक्त

Corona virus : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ; ४१५ जण झाले कोरोनामुक्त

Next

पुणे : शहरातील कोरोनावाधितांची संख्या सोमवारी पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात ४०६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध प्रयोगशाळांमध्ये ४ हजार ८१५ तपासण्या करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८. ४३ टक्के आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ५९४ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २६२ इतकी आहे़  तर आज दिवसभरात ४१५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९०६ इतकी झाली आहे. 

शहरात आजपर्यंत ११ लाख ४८ हजार ६६१ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३ हजार १०८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९३ हजार ३४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८५९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Corona virus : Comfortable! 406 corona patients increasing in Pune on Monday; 415 were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.