शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 21:32 IST

या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे.

चाकण : औद्योगिक क्षेत्रातील खालुंब्रे (ता. खेड) येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय मुलाकडून केवळ तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (दि. १ मे २०२६) चाकण औद्योगिक क्षेत्रातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत शोधमोहीम सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नागरिकांकडून चौकशी करणे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास वेगाने पुढे नेण्यात आला. या शोधादरम्यान शेजारील एका खोलीत संशयास्पद स्थितीत ठेवलेल्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये त्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. संबंधित बालकावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तातडीने तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी हा मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी स्वतःही अल्पवयीन आहे.

गुन्हा केल्यानंतर तो राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी वेगाने हालचाल करत पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संपूर्ण घटनेचा तपशील उलगडण्याचे काम सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chakan: Minor arrested for sexually assaulting, murdering 3-year-old child.

Web Summary : A 16-year-old has been arrested in Chakan for the brutal murder of a 3-year-old after sexually assaulting the child. Police apprehended the suspect within 12 hours at Pune railway station as he attempted to flee. The incident has sparked outrage.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस