शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेवचा अन् लाच घेताना पकडले पुण्यात ; भरपावसात बस स्टॉपवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:37 IST

वारसांची नोंद घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने १० हजार रुपयांची लाच मागितली....

पुणे : वारसांची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी ८ हजारांची लाच मागणार्‍या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील तलाठ्याला पौड रोडवरील नळस्टॉप येथे खासगी व्यक्तीमार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पौड रोडवरील आयडियल कॉलनी समोरील बसस्टॉपवर सापळा रचून भरपावसात ही कारवाई केली. 

तलाठी राजेश उत्तम गायकवाड (वय ४०), संग्राम नथु भगत (वय ४१) अशी दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी महिला वकिलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या आशिलाच्या वारसांची नोंद घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार वकिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची आज पडताळणी केली. तेव्हा त्याने तडजोडीअंती ८ हजार रुपयांची मागणी करुन ती खासगी व्यक्ती संग्राम भगत यांच्याकरवी स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत. .......जमीन इंदापूरात कारवाई पुण्यातया कारवाईतील जमीन ही इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात आहे. तक्रारदार महिला वकिल आणि त्यांचे आशिल हे पुण्याचे रहिवासी आहेत. तसेच गायकवाड यांचा भाऊ पुण्यात राहतो. त्याच्याकडे गायकवाड आले होते. त्यामुळे लाचेची रक्कम पुण्यात देण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड याने पौड रोडवरील आयडियल कॉलनीसमोरील बसस्टॉपजवळ पैसे घेऊन येण्यास व संग्राम भगतकडे देण्यास सांगितले. त्यानुसार या तक्रारदार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तेथे पोहचल्या. त्यावेळी पाऊस सुरु होता. तरीही भररस्त्यात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराकडून संग्राम भगत याने पैसे स्वीकारताच त्याला पकडण्यात आले. त्याबरोबर तलाठी गायकवाडलाही लगेचच ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरणIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारी