विवाहित मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 21:18 IST2026-05-05T21:16:56+5:302026-05-05T21:18:00+5:30

पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सर्व ७ आरोपींना अटक केली आहे.

case registered against seven people including father for kidnapping married girl | विवाहित मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल

विवाहित मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी वडिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, अवसरी - आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी इतर साथीदारांसह अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सर्व ७ आरोपींना अटक केली आहे.

दि. ०४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सौ. साक्षी विशाल भागवत (रा. पारगाव, लबडे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी तिला मारहाण करत, शिवीगाळ व दमदाटी करून जबरदस्तीने एका वाहनात टाकून अपहरण केले. या अपहरणामागील उद्देश फिर्यादीस जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत अवघ्या ४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शिवाजी भाऊ खाटेकर (वय ४५, रा. पारगाव, ता. आंबेगाव,) अमोल चांगदेव रोडे (वय ३३), सचिन रावसाहेब रोडे (वय २९), अक्षय विश्वनाथ वाडगे (वय २९), अभिजीत बारकू रोडे (वय २६), नंदकिशोर विलास तितर (वय ३२, सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), जयश्री अशोक कुदनर (वय ३५, रा. साकोर, ता. संगमनेर, जि. अहील्यानगर) यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाउसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, सचिन डामसे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अंभग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप व महिला पोलीस अंमलदार काजल फलके यांनी केली.
 

Web Title : विवाहित महिला का अपहरण: पिता सहित सात लोगों पर मामला दर्ज

Web Summary : अंबेगांव में एक विवाहित महिला का उसके पिता और साथियों ने अपहरण कर लिया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए चार घंटे के भीतर सभी सात आरोपियों को गिरफ्तार कर लिया। जबरन दूसरी शादी कराने का मामला सामने आया है। जांच जारी है।

Web Title : Married woman kidnapped by father, seven booked in Ambegaon

Web Summary : In Ambegaon, a married woman was kidnapped by her father and accomplices. Police swiftly arrested all seven accused within four hours. The motive appears to be forcing the woman into another marriage. Investigations are ongoing.