शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीने सात जणांना उडविले

By admin | Updated: April 7, 2015 05:33 IST

राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले.

राजगुरुनगर : राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले. त्यात सातही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चारच्या सुमारास गावातून मारुती मंदिराच्या उताराला ही मोटार जोरात आली. तिचा धक्का दोघां तिघांना बसला. त्याच वेळी ती आपली बाजू सोडून उजव्या बाजूच्या वैशाली जनरल स्टोअर्सला धडकली. त्यामुळे पुन्हा डावीकडे वळाली आणि वळताना आणखी तीन चार जणांना जखमी केले. तर एक जण या गाडीखाली सापडले. लोकांनी गाडी उचलून त्यांना बाहेर काढले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूटरला आणि एका मोटारसायकललाही तिने धडक दिली़ यावेळी जमलेल्या जमावाने चालकाला त्यांनी मारहाण केली़ लोकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. जगदीश रामनाथ अकुल(वय ६५), अतुल विष्णू सावंत( वय १५), सुरेय्या दगडू तांबोळी(वय ५५) हे राजगुरुनगर येथील रहिवासी यात जखमी झाले. तर शाम सुरेश गोपाळे ( वय २५), गणपत दगडू गोपाळे (वय ७५) आणि अश्विनी सीताराम केदारी (वय ९ ) हे तिघेजण आडगाव( ता. खेड ) आणि विलास बांगर ( वय ३०) हे एकलहरे ( ता-खेड ) अशी जखमींची नावे आहेत़ (वार्ताहर)