आपटे रस्त्यावरील हाॅटेलमध्ये आढळला उद्योजकाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 19:59 IST2026-05-12T19:59:17+5:302026-05-12T19:59:49+5:30

उद्योजकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय असून या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे

Businessman's body found in hotel on Apte Road | आपटे रस्त्यावरील हाॅटेलमध्ये आढळला उद्योजकाचा मृतदेह

आपटे रस्त्यावरील हाॅटेलमध्ये आढळला उद्योजकाचा मृतदेह

पुणे : आपटे रस्त्यावरील एका हाॅटेलमधील रूममध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला. उद्योजकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. लोढा पार्क, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे मृतावस्थेत सापडलेल्या उद्योजकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार स्वारगेट पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, शनिवारी दुपारी आपटे रस्त्यावरील एका हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधला. हाॅटेलमधील खोलीचा दरवाजा बंद असून, आतमध्ये असलेल्या व्यक्तीकडून प्रतिसाद दिला जात नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचारी हाॅटेलमध्ये पोहोचले.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा जैन हे खोलीत बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर जैन यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ‘जैन यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल’, असे डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले.

पोलिसांनी हाॅटेलमधील खोलीची पाहणी केली. खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. जैन यांनी चिठ्ठीत आर्थिक समस्यांबाबत उल्लेख केला आहे. नातेवाईकांच्या मदतीने चिठ्ठीची पडताळणी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title : पुणे होटल में व्यवसायी मृत पाया गया, आत्महत्या का संदेह

Web Summary : पुणे के एक होटल के कमरे में व्यवसायी अशोक जैन मृत पाए गए। एक नोट में वित्तीय समस्याओं का उल्लेख होने के कारण आत्महत्या का संदेह। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Businessman Found Dead in Pune Hotel, Suspected Suicide

Web Summary : Pune businessman Ashok Jain found dead in a hotel room. Suicide suspected due to financial issues mentioned in a note. Police investigating.