शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:25 IST

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे

भोर : भोर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले आहे. धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

शाखा अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाटबंधारे विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाटघर धरणाची वैशिष्ट्ये 

पाणी साठवण क्षमता : २३ टीएमसीदरवाजांची संख्या : एकूण ८१ (४५ स्वयंचलित, ३६ रोलिंग)विसर्ग क्षमता : एका वेळी ५७,००० क्युसेकसध्याचा विसर्ग : ३,०५० क्युसेक (५ स्वयंचलित दरवाजांमधून)

नीरा-देवघर धरण ९८ टक्के भरले 

दरम्यान, हिर्डोशी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नीरा-देवघर धरण ९८ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत हे धरणदेखील १०० टक्के भरेल, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यंदा ऑगस्ट महिन्याच्या मध्यात पावसाने उसंत घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग