शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 22:36 IST

"जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबीयांना वाचवायचे असेल, तर ताबडतोब देश सोडा."

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. रविवारी अर्थात ३० नोव्हेंबरला ट्रम्प यांनी मादुरो यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे मान्य केले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, यासंदर्भातील माहिती समोर आली नव्हती.

ट्रम्प यांनी मादुरो यांना दिली देश सोडण्याची धमकी -'मियामी हेराल्ड'च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून निकोलस मादुरो यांना थेट धमकी दिली आहे. "जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबीयांना वाचवायचे असेल, तर ताबडतोब देश सोडा." ट्रम्प यांनी मादुरो, यांची पत्नी सिलिया फ्लोरेस आणि मुलाला सुरक्षितपणे देशाबाहेर पडण्याची ऑफर दिली आहे. यासाठी 'ताबडतोब देश सोडण्याची' अट ठेवण्यात आली आहे. मात्र, व्हेनेझुएलाने ही अटी मान्य करण्यास नकार दिला आणि चर्चा निष्फळ ठरली.

अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार? -व्हेनेझुएला मार्गे अमेरिकेत होणाऱ्या ड्रग्जच्या तस्करीसंदर्भात अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द (Airspace) बंद करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर लिहिले होते, "सर्व एअरलाइन्स, पायलट, ड्रग्ज डिलर्स आणि मानवी तस्करांना विनंती आहे की त्यांनी व्हेनेझुएलावरील आणि त्याच्या जवळपासचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद मानावे." यावर, मादुरो सरकारने या निर्णयावर आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन आणि एका स्वतंत्र राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी थेट धमकी असल्याचे म्हटले आहे. खरे तर, व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंदच्या घोषणेमुळे, अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत तर नाही ना?, अशा चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांसंदर्बात, अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा भाष्य करण्यात आलेले नाही.कॅरिबियनमध्ये अमेरिकेचे हल्ले सुरूच - तत्पूर्वी, कॅरिबियनमध्ये (Caribbean) कथित ड्रग्ज बोटींविरुद्ध अमेरिकेचे हल्ले गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहेत. या शिवाय या भागात अमेरिकेची सैन्यतैनातही वाढली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये गुप्त सीआयए (CIA) मोहिमांना अधिकृतता दिली आहे. या आठवड्यात त्यांनी सैन्यदलाच्या सदस्यांना सांगितले होते की, व्हेनेझुएलातील संशयित ड्रग्ज तस्करांना रोखण्यासाठी अमेरिका लवकरच जमिनी स्तरावर मोहीम सुरू करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens Maduro: "Leave the Country Immediately!" US-Venezuela War Looms?

Web Summary : Trump threatened Maduro to leave Venezuela to save his family. Tensions escalate over drug trafficking, with airspace closures and increased US military presence in the Caribbean, fueling war concerns.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाwarयुद्ध