न्यूयॉर्क - गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना, अभिनेता रणबीर कपूर, यूट्यूबचे प्रमुख नील मोहन व न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांचा यंदाच्या टाइम नियतकालिकाच्या ‘जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या’ यादीत समावेश करण्यात आला आहे.
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ १४वे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, नेपाळचे ३५ वर्षीय पंतप्रधान बालेंद्र शाह यांचाही समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या नासाच्या आर्टेमिस २ या मोहिमेचे कमांडर रीड वाइसमन यांचे नावही या यादीत समाविष्ट आहे.
उत्पादन संशोधनाबाबत पिचाई यांची मोठी प्रगती गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंबद्दल टाइमने म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणारे काही मोजक्या व्यक्ती आहेत. गुगलची उत्पादने अब्जावधी लोक वापरत असून २०१५पासून त्या कंपनीचे सीईओ असलेल्या पिचाई यांनी उत्पादनांच्या संशोधनाबाबत प्रगती साधली आहे. झोहरान ममदानी यांच्याबाबत टाइमने म्हटले आहे की, त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला नवीन गती दिली आहे. त्यांच्या धोरणांमुळे गुंतवणुकीवर परिणाम होईल अशी टीका अनेकजण करतात.
‘विकास खन्ना जगभरातील लोकांशी जडलेले’मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना यांच्याबाबत टाइमने म्हटले आहे की, ते अतिशय संवेदनशील आणि दयाळू व्यक्ती आहेत. ते खाद्यपदार्थांच्या माध्यमातून जगभरातील समुदायांशी जोडले जातात आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील आपल्या ‘बंगलो’ रेस्टॉरंटद्वारे संस्कृती आणि संकल्पना यांचा उत्तम मेळ घातला आहे.
रणबीर कपूर यांच्या अभिनयातून भावनिक गोष्टींचे दर्शनरणबीर कपूर यांच्याबाबत टाइम नियतकालिकात अभिनेता आयुष्मान खुराणा यांनी लिहिलेल्या प्रोफाइलमध्ये म्हटले आहे की ते केवळ स्टार नाहीत तर अभिनयातून भावनिक गोष्टींचे उत्तम दर्शन घडणारे कलाकार आहेत. रणबीर कपूर यांचे काम हा भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर जोडणारा सांस्कृतिक पूल आहे.
Web Summary : Sundar Pichai, Vikas Khanna, and Ranbir Kapoor are on TIME's 100 Most Influential list. The list includes global leaders like Donald Trump and Xi Jinping. Pichai is recognized for AI advancements, Khanna for culinary connections, and Kapoor for impactful acting.
Web Summary : सुंदर पिचाई, विकास खन्ना और रणबीर कपूर टाइम पत्रिका की 100 सबसे प्रभावशाली लोगों की सूची में हैं। इस सूची में डोनाल्ड ट्रंप और शी जिनपिंग जैसे वैश्विक नेता शामिल हैं। पिचाई को एआई प्रगति, खन्ना को पाक कला कनेक्शन और कपूर को प्रभावशाली अभिनय के लिए पहचाना गया है।