नागपूर - वीज स्वस्त असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात प्रतियुनिट ९.९० पैशांची वाढ केली आहे. ही अतिरिक्त वसुली औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून करण्यात येणार आहे.
महावितरणने १ डिसेंबरपासून ही वसुली लागू झाल्याची घोषणा केली. आता औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून विक्री कर म्हणून प्रतियुनिट अनुक्रमे २८.९४ पैसे आणि २७.९० पैसे आकारले जातील. यापूर्वी हा दर अनुक्रमे १९.०४ पैसे आणि १८.०० पैसे होता.
राज्यातून उद्योग इतर राज्यांत जाण्याची भीतीऊर्जातज्ज्ञ महेंद्र जिचकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वीजदर तुलनेने आधीच जास्त आहेत. उद्योगांना वीजदर आणखी कमी होण्याची अपेक्षा होती; मात्र कर वाढवून वीज आणखी महाग करण्यात आली आहे. यामुळे राज्यातून उद्योगांचे पलायन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विक्रीकराच्या रकमेचा उपयाेग शेतकऱ्यांसाठीविजेवरील विक्रीकर राज्य सरकारच्या खात्यात जमा होताे. करातील या वाढीचा उपयोग राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी केला जाणार आहे. याआधीच रूफटॉप सोलर बसवून सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांवर ग्रिड सपोर्ट चार्ज आणि टीओडी नियमांतील बदलांमुळे आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता इतर उद्योगांसह व्यावसायिक ग्राहकांवरही या करवाढीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
Web Summary : Maharashtra's industries face higher electricity costs as the government increases the tax on electricity sales by 9.90 paise per unit, impacting industrial and commercial consumers. Concerns rise about businesses relocating due to increased expenses, despite the revenue supporting solar agriculture projects.
Web Summary : महाराष्ट्र में उद्योगों को बिजली की बढ़ी हुई लागत का सामना करना पड़ रहा है क्योंकि सरकार ने बिजली की बिक्री पर कर में 9.90 पैसे प्रति यूनिट की वृद्धि की है, जिससे औद्योगिक और वाणिज्यिक उपभोक्ता प्रभावित हैं। सौर कृषि परियोजनाओं का समर्थन करने वाले राजस्व के बावजूद, बढ़े हुए खर्चों के कारण व्यवसायों के स्थानांतरित होने की चिंता बढ़ रही है।