शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 05:57 IST

ITR News: आयकर विवरणपत्र (आयटीआर) वेळेत सादर न करणाऱ्या अनिवासी भारतीय (एनआरआय) करदात्यास दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. “कायद्याचे अज्ञान किंवा माहितीचा अभाव ही सबब होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने विलंब माफ करण्यास ठाम नकार दिला आहे.

नवी दिल्ली  -  आयकर विवरणपत्र (आयटीआर) वेळेत सादर न करणाऱ्या अनिवासी भारतीय (एनआरआय) करदात्यास दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. “कायद्याचे अज्ञान किंवा माहितीचा अभाव ही सबब होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने विलंब माफ करण्यास ठाम नकार दिला आहे.  कॅनडास्थित अनिवासी भारतीय मनजित सिंह धालिवाल यांनी आयकर विवरणपत्र भरण्यास पाच वर्षांचा विलंब केला होता.

ज्येष्ठ नागरिक असल्याचा बचाव : भारतात मालमत्ता विकून मिळालेल्या उत्पन्नावर त्यांनी विवरणपत्र सादर केले नव्हते. आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, परदेशात राहतो व भारतीय कर नियमांची तांत्रिक माहिती नसल्याने ही चूक झाली, असा बचाव त्यांनी केला होता. 

आयकर विवरणपत्र कुठूनही भरता येतेदिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. कामेश्वर राव आणि न्या. विनोद कुमार यांच्या खंडपीठाने मनजित सिंह यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की,  आयकर विवरणपत्र आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ऑनलाइन भरता येते, त्यासाठी व्यक्तीचे भारतात प्रत्यक्ष हजर असणे अनिवार्य नाही.‘इग्नोरंशिया लेजिस नेमिनेम एक्सकुसॅट’ (कायद्याचे अज्ञान ही सबब असू शकत नाही), या तत्त्वानुसार, कायदा माहीत नव्हता हे कारण न्यायालयात टिकू शकत नाही. याचिकाकर्त्याने दिलेली वैद्यकीय कारणे जुनी आहेत. तसेच, मालमत्तेचे व्यवहार करताना ते सक्षम होते, मग कर नियमांचे पालन का केले नाही? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.करदात्यांनी वैधानिक कालमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून, केवळ “माहीत नव्हते” या कारणास्तव विवरणपत्र भरण्यास झालेला विलंब ग्राह्य धरला जाणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ignorance of law no excuse for ITR filing delay: Court

Web Summary : Delhi High Court rejected NRI's plea citing ignorance of tax laws for ITR delay. Online filing availability and legal principle were highlighted.
टॅग्स :Courtन्यायालयIncome Taxइन्कम टॅक्स