मंड्या - पाणी संवर्धन, नैसर्गिक शेती, आरोग्य आणि सेवा यांसह नऊ सामूहिक प्रतिज्ञांचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील नागरिकांना केले.
या नऊ संकल्पांवर प्रामाणिकपणे काम केले, तर विकसित कर्नाटकसोबतच विकसित भारताचे स्वप्न साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या मंड्या येथील आदिचुंचनगिरी महासंस्थान मठात ‘श्री गुरू भैरवैक्य मंदिरा’च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.
काेणत्या आहेत नऊ सेवा?पाणी व्यवस्थापन व संवर्धन, ‘आईच्या नावाने एक झाड’ अंतर्गत वृक्षारोपण, सार्वजनिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता, ‘वोकल फॉर लोकल’द्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, देशांतर्गत पर्यटन, रसायनमुक्त नैसर्गिक शेती, भरड धान्यांचा (मिलेट्स) आहारात वापर व तेलाचे प्रमाण कमी करणे, योग-फिटनेस आणि सेवाभाव या नऊ संकल्पांचा उल्लेख त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना केला.
कालभैरवेश्वर स्वामी मंदिरात मोदींनी केली पूजापंतप्रधान मोदींनी या उद्घाटनापूर्वी ज्वाला पीठ व श्री कालभैरवेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली.या संस्थेने समाजाला केवळ धार्मिक मार्गदर्शनच नाही, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले असल्याचे आदिचुंचनगिरी मठाच्या आध्यात्मिक परंपरेचे कौतुक करताना मोदी यांनी नमूद केले.
Web Summary : Prime Minister Modi urged citizens to adopt nine collective pledges, including water conservation, natural farming, and healthcare. He believes these commitments can realize a developed India alongside a developed Karnataka. He highlighted water management, tree planting, local products, domestic tourism, chemical-free farming, millet use, fitness, and service.
Web Summary : प्रधानमंत्री मोदी ने जल संरक्षण, प्राकृतिक खेती, स्वास्थ्य सहित नौ सामूहिक प्रतिज्ञाओं को अपनाने का आग्रह किया। उनका मानना है कि ये प्रतिबद्धताएं विकसित कर्नाटक के साथ एक विकसित भारत को साकार कर सकती हैं। उन्होंने जल प्रबंधन, वृक्षारोपण, स्थानीय उत्पादों, घरेलू पर्यटन, रसायन मुक्त खेती, बाजरा उपयोग, फिटनेस और सेवा पर प्रकाश डाला।