शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:07 IST

Andhra Pradesh Kurnool Accident: आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एका बोलेरो गाडीची आणि रेडी-मिक्स काँक्रीट वाहून नेणाऱ्या लॉरीची समोरासमोर भीषण धडक झाली.

आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एका बोलेरो गाडीची आणि रेडी-मिक्स काँक्रीट वाहून नेणाऱ्या लॉरीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्वजण देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

नेमकी घटना काय?

हा अपघात मंत्रालयम मंडलातील चिलकलदोना गावाजवळ घडला. कर्नाटकच्या चिक्कमगलूर जिल्ह्यातील काही भाविक बोलेरो गाडीने श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी मंत्रालयमच्या दिशेने जात होते. यावेळी चिलकलदोना गावाजवळ त्यांच्या गाडीची समोरून येणाऱ्या एका लॉरीशी जोरदार धडक झाली. या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जणांचा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. जखमींवर येम्मिगनूर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती कर्नूल पोलिसांनी दिली.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.  मृतांची ओळख पटली असून ते सर्वजण कर्नाटक राज्यातील चिक्कमगलूर भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला शोक

आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री मंदीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृत भाविकांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना योग्य आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, असे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims' Vehicle Accident in Andhra Pradesh: Eight Killed, Twelve Injured

Web Summary : A collision in Andhra Pradesh's Kurnool district between a Bolero and a concrete mixer claimed eight lives and injured twelve pilgrims en route to a shrine. The accident occurred near Chilakaladona village. Police are investigating.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघात