शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 21:27 IST

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी परगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात शिरून वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेल्या दागिने आणि पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज भागात ही घटना घडली असून, या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यात चक्क वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली गायब केल्याचे उघडकीस आले आहे. वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले ९९ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले, अशी माहिती मिळाली आहे. ३० वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

घर बंद असल्याचा चोरट्यांनी घेतला गैरफायदा

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार पुण्यातील कात्रज भागात असलेल्या सच्चाई माता मंदिर परिसरात २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान घडला. फिर्यादी हे त्यांच्या परिवारासह त्यांच्या साडूच्या भावाच्या अंत्यविधीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी लॉक केलेला घरचा दरवाजा हत्याराच्या साह्याने तोडला आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात अनेक ठिकाणी हाती काही लागतं आहे का यासाठी शोध घेतला तेव्हा त्यांची नजर घरामध्ये असलेल्या वॉशिंग मशीन कडे गेली. तेव्हा त्यांनी वॉशिंग मशीन उघडली असता त्यात एक डब्बा ठेवल्याचे दिसून आले. या डब्ब्यात सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम फिर्यादी यांनी ठेवली होती.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डब्यामध्ये साधारण ९९ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. चोरट्यांनी तो दागिन्यांचा डबा घेऊन तिथून पसार झाले. आंबेगाव पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thieves target family at funeral, steal valuables from washing machine.

Web Summary : Pune family attending a funeral in Latur returned to find their home burgled. Thieves broke in, discovered jewelry and cash hidden in the washing machine, and stole valuables worth ₹99,000. Police are investigating the incident in Katraj.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी