अमेरिकन नौदलाने इराणविरुद्धची आपली सागरी नाकेबंदी अधिक कडक केली असून, आतापर्यंत ३१ जहाजांना इराणच्या बंदरांकडे जाण्यापासून रोखले आहे. १३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापार पूर्णपणे मंदावला असून, अमेरिकेने इराणचा जगाशी असलेला सागरी संपर्क तोडण्यासाठी प्रचंड लष्करी शक्ती तैनात केली आहे.
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी अमेरिकेने केवळ मध्य-पूर्वेतच नव्हे, तर इतर सागरी प्रदेशांतही आपली पकड घट्ट केली आहे. सेंटकॉमच्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी अमेरिकेने मोठ मोठी हत्यारे तैनात केली आहेत.
सैन्य: १०,००० हून अधिक सैनिक.
युद्धनौका: विमानवाहू जहाजांसह १७ पेक्षा जास्त युद्धनौका आणि क्षेपणास्त्र विनाशक.
हवाई ताकद: १०० हून अधिक लढाऊ विमाने, ड्रोन आणि इंधन भरणारी विमाने.होर्मुझमधील वाहतूक पुन्हा कधी सुरू होणार?
या नाकेबंदीचा सर्वाधिक परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीवर झाला आहे, हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे. सागरी वाहतूक लक्षणीयरीत्या मंदावली आहे, ती पूर्ववत झालेली नाही, लगेच होईल की नाही याची शक्यताही नाही. बाजारातील आकडेवारीसुद्धा हेच दर्शवते. ३० जूनपर्यंत होर्मुझमधील वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता जवळपास शून्य मानली जात आहे. यामुळे व्यापारात घट झाली आहे.
ही नाकेबंदी फक्त एक लष्करी उपाय नसून, इराणवर आर्थिक दबाव आणण्याची एक रणनीती आहे. शस्त्रसंधी वाढवण्यात आली असली तरी, वाटाघाटींमधून कोणताही ठोस परिणाम साधलेला नाही. त्यामुळे, अमेरिका आपली दडपशाही सुरू ठेवू शकते. शस्त्रसंधी वाढवताना ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की, इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी सुरूच राहील.
आता सर्वांचे लक्ष अमेरिका आणि इराण यांच्यात करार होईल की नाही याकडे लागले आहे. या प्रदेशातील लष्करी हालचालींमधील बदल आणि नाकेबंदीबाबतचे नवीन निर्णय यांचाही परिस्थितीवर परिणाम होईल. होर्मुझमधील परिस्थिती लवकरच सामान्य होणार नाही आणि तणाव कायम राहू शकतो.
Web Summary : The US Navy's blockade has intensified pressure on Iran, halting 31 ships. This has severely impacted Hormuz Strait trade, with no immediate resumption in sight, escalating economic tensions.
Web Summary : अमेरिकी नौसेना की नाकेबंदी ने ईरान पर दबाव बढ़ाया, 31 जहाजों को रोका। होर्मुज जलसंधि में व्यापार प्रभावित, तत्काल बहाली की संभावना नहीं, आर्थिक तनाव बढ़ा।