Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:24 IST

लेकीच्या जन्मानंतर दोन सिनेमांमधून दीपिकाला बाहेर पडावं लागलं होतं.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली. लेक दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी ती पुन्हा आई होणार आहे. ही गुडन्यूज समजताच चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. एकीकडे प्रेग्नंसीची घोषणा तर दुसरीकडे दीपिका दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटलीच्या 'राका' सिनेमात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र आता प्रेग्नंसीमुळे दीपिका या सिनेमातून बाहेर पडणार का? असा संभ्रम निर्माण झाला. यावर नुकतंच मेकर्सने उत्तर दिलं आहे.

'राका' सिनेमातून दीपिका पादुकोणला बाहेर काढल्याच्या किंवा तिची भूमिका कमी केल्याची चर्चा झाली. या चर्चांवर आता मेकर्सने उत्तर दिलं आहे. टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिनेमाच्या प्रमोशनल टीमने स्पष्ट केले की, "सगळं नियोजनाप्रमाणेच सुरु आहे. काहीही बदल करण्यात आलेला नाही. दीपिकाची सिनेमात महत्वाची भूमिका आहे आणि ती सेटवर दमदार एनर्जीने काम करत आहे. शूटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा अडसर आलेला नाही. दीपिका कामाप्रती प्रोफेशनल आहे. तसंच सेटवर सुरक्षा आणि सोयीसुविधांची खबरदारी घेण्यात आली आहे. सिनेमाचं शेड्युल वेगाने पुढे जात आहे आणि डेडलाईन आधीच काम पूर्ण करण्याची टीमची तयारी आहे."

'राका' सिनेमासाठी दीपिका ॲक्शन सीन्सचंही शूट करत आहे. प्रेग्नंसीतही ती पूर्ण एनर्जीने हे सीन्स पूर्ण करत आहे. याआधीही तिने पहिल्या प्रेग्नंसीवेळी 'सिंघम अगेन' सिनेमासाठी मेहनत घेतली होती. २०२४ मध्ये तिने दुआला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली. तसंच मानधनात वाढ, प्रॉफिट शेअर असा मागण्याही केल्याची चर्चा झाली होती. यामुळे तिला 'स्पिरीट' आणि 'कल्की २' या बिग बजेट सिनेमातून बाहेर पडावं लागलं होतं. दरम्यान आता दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे तिला 'राका' हा बिग बजेट सिनेमाही गमवावा लागेल अशी चर्चा झाली होती. या चर्चांना मेकर्सने पूर्णविराम दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Deepika Padukone remains in 'Raaka' despite second pregnancy, clarifies makers.

Web Summary : Makers deny rumors of Deepika Padukone's exit from 'Raaka' due to her second pregnancy. She continues filming action scenes with full energy. The team ensures safety and facilities, keeping the schedule on track, dispelling concerns about her role.
टॅग्स :दीपिका पादुकोणअल्लू अर्जुनप्रेग्नंसीTollywood