-शेखर देसाईलासलगाव (नाशिक) - आध्यात्मिक उपचारांच्या माध्यमातून 'करणीबाधे'ची भीती दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबावर अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'धारणगाव खडक' (ता. निफाड) येथील या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिकमधील आहे. मागील काही काळापासून कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे ती त्रस्त होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तिच्या पालकांनी तिला धारणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते.
याच मंदिरात महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदू बाबाने तिला गाठले. 'तुझ्यावर करणीबाधा झाली आहे' असे सांगून त्याने पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. याच भीतीचा आणि त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्याने उपचारांच्या नावाखाली या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने पीडितेवर शारीरिक अत्याचार केले व याबद्दल कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.
या भयंकर प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस एकवटून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर, याची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून लासलगाव पोलिसांनी आरोपी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
काही काळ भीतीपोटी गप्प बसलेल्या पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत संपूर्ण प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) कडे दिली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाणे येथे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक दिपक पाटील करत आहे.
Web Summary : A fake baba in Nashik has been arrested for sexually assaulting a 28-year-old woman after falsely claiming she was cursed. He exploited her family's distress, threatening her into silence. Police are investigating following a complaint filed with the help of anti-superstition activists.
Web Summary : नाशिक में एक ढोंगी बाबा को 28 वर्षीय महिला को शापित बताकर यौन उत्पीड़न करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उसने पीड़िता के परिवार की मजबूरी का फायदा उठाया और उसे चुप रहने की धमकी दी। अंधविश्वास विरोधी कार्यकर्ताओं की मदद से शिकायत दर्ज होने के बाद पुलिस जांच कर रही है।